शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

धक्कादायक! शिक्षकाने विद्यार्थ्याला आधी मारहाण केली नंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरून फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 10:28 PM

या घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भरत असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता.

कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका विद्यार्थ्याला सरकारी शाळेतील शिक्षकाने बेदम मारहाण केली. त्यानंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून फेकून दिले. त्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षक मुथप्पा यांनी पहिल्यांदा १० वर्षीय विद्यार्थ्याला फावडे मारले. त्यानंतर त्याला बाल्कनीतून फेकून दिले. या घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भरत असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता.

गडक जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवप्रकाश देवराजू यांनी सांगितले की, शिक्षकाने केलेल्या या कृत्यामागे कौटुंबिक वाद असण्याची शक्यता आहे. आरोपी शिक्षक मुथप्पाने याच शाळेत शिक्षिका असलेल्या भरतची आई गीता बारकर यांनाही मारहाण केली होती. तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी मुथप्पा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका शाळेतून अशीच एक घटना समोर आली होती. रागाच्या भरात शिक्षिकेने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीवर कात्रीने हल्ला केला आणि तिला सरकारी शाळेच्या पहिल्या मजल्यावरून फेकून दिले. ही विद्यार्थिनी दिल्लीच्या मॉडेल बस्ती येथे असलेल्या दिल्ली महानगरपालिकेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी होती. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी सांगितले होते की, त्यांची मुलगी बोलू शकत नाही आणि खाऊ शकत नाही.

वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला होतायाप्रकरणी वडिलांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत त्याने आपण रोजंदारी मजूर असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी त्यांना मुलीच्या घटनेची माहिती देण्यात आली. शाळेकडून हल्ल्याची माहिती मिळाली, तेव्हा मी कामावर होतो असे ते म्हणाले. शाळेत पोहोचल्यावर त्यांना सांगण्यात आले की, मुलीला हिंदुराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक