"इसे मार डालो, चलो ख़त्म करें...", काँग्रेस नेत्याने रचला भाजपा आमदाराच्या हत्येचा कट, Video व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 02:34 PM2021-12-02T14:34:20+5:302021-12-02T14:42:47+5:30

Crime News : सोशल मीडियावर काँग्रेस नेत्याचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

karnataka congress leader caught on camera planning murder of bjp mla sr vishwanath | "इसे मार डालो, चलो ख़त्म करें...", काँग्रेस नेत्याने रचला भाजपा आमदाराच्या हत्येचा कट, Video व्हायरल 

फोटो - सोशल मीडिया

Next

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान आता एक भयंकर घटना समोर आली आहे. काँग्रेस नेत्याने भाजपा आमदाराच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती आता समोर आली आहे. याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये हा प्रकार घडला असून सोशल मीडियावर काँग्रेस नेत्याचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. "इसे डालो, चलो ख़त्म करें..." असं म्हणत एक काँग्रेस नेता भाजप आमदाराच्या हत्येची योजना आखत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या काँग्रेस नेत्याचं नाव गोपालकृष्ण असं आहे. गोपालकृष्ण व्हिडिओमध्ये कर्नाटकचेभाजपाचे आमदार एसआर विश्वनाथ यांची हत्या आणि त्यांना संपवण्याबाबत बोलताना दिसत आहेत. कर्नाटकातील येलाहंका येथील भाजपा आमदार विश्वनाथ यांच्या हत्येची योजना गोपालकृष्ण कथितपणे आखत असल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये दिसत आहे. या घटनेने राजकारण चांगलंच तापलं असून या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

'मारून टाका, आमदाराला संपवा'

इंडिया टुडेने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, काँग्रेस नेत्याचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ तीन मिनिटांचा आहे. यामध्ये काँग्रेस नेता दुसऱ्या एका व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहे. 'मारून टाका, आमदाराला संपवा' असं संभाषणात ऐकू येतं. "1 कोटी रुपये होऊ दे. ठीक आहे. चला संपवूया, पण कोणालाही हे समजलं नाही पाहिजे... हे फक्त आपल्यातच असायला हवं" असं देखील काँग्रेसच्या नेत्याने म्हटलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू 

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे शोधलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी कर्नाटक पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. या मुद्द्यावर भाजपा आमदार विश्वनाथ यांच्याशीही बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. गृहमंत्र्यांनी देखील'मला काल रात्री व्हिडिओबद्दल समजलं. एफआयआर नोंदवण्याचा निर्णय पोलीस घेतील. गरज पडल्यास आमदारांला सुरक्षा दिली जाईल. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: karnataka congress leader caught on camera planning murder of bjp mla sr vishwanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.