बंगळुरु – कर्नाटकातील बंगळुरुमध्ये ६७ वर्षीय स्थानिक रहिवाशाला पोस्ट विभागाने ५५ हजार रुपये नुकसान भरपाई दिली आहे. ६ वर्ष कायद्याची लढाई लढल्यानंतर अखेर पोस्ट विभागने नुकसान भरपाई देण्यास सहमती दर्शवली. पोस्टाने ही नुकसान भरपाई देण्यामागचं कारणही तसे महत्त्वाचे होते, या व्यक्तीच्या मुलांची ऑरिजनल मार्क्सशीट असलेले पत्र पोस्टाकडून हरवलं होतं.
या प्रकरणात कर्नाटकच्या स्थानिक कोर्टाने पोस्ट विभागाला १९८८ च्या कायद्यानुसार संबंधित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. बंगळुरुच्या कोरमंगला परिसरात राहणाऱ्या एल. जयकुमार यांनी जून २०१३ मध्ये एक पत्र बंगळुरुहून मुंबईला पाठवलं होतं. पण हे पत्र मुंबईला पोहचलं नाही, त्यामुले जयकुमार यांनी कोरमंगलाच्या पोस्ट ऑफिसमध्ये याबाबत तक्रार केली. ७ ऑगस्ट २०१३ मध्ये पोस्ट विभागाने उत्तर देत म्हटलं की, त्यांचे पत्र चुकीने बंगळुरुच्या इलेक्ट्रॉनिक सिटीच्या पत्त्यावर पोहचवण्यात आलं.
अनेक प्रयत्नानंतर जेव्हा पत्र आणि त्यासोबत पाठवलेली कागदपत्रे मिळाली नाहीत म्हणून पोस्टाने हे प्रकरण बंद केले. मात्र जयकुमार यांनी पोस्ट विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले, पोस्ट विभागाने कोर्टात अनेक युक्तिवाद केले, त्यावर जयकुमार यांच्या वकीलांना मागील काही प्रकरणांचा हवाला देत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
हे प्रकरण तब्बल ६ वर्ष कोर्टात सुरु होतं, त्यानंतर अखेर कोर्टाने कायद्यानुसार तक्रारकर्ते जयकुमार यांच्या बाजूने निकाल दिला. पोस्ट विभाग कायदा १९८८ च्या नियमांच्या अंतर्गत २४ जून २०२० रोजी जयकुमार यांना ५० हजार नुकसान भरपाई आणि कोर्टाचा खर्च असे एकूण ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कोर्टाने पोस्ट विभागाला दोषी ठरवत आदेश जारी केल्यानंतर ६० दिवसांच्या आत ही नुकसान भरपाई तक्रारदाराला देण्यात यावी असंही आदेशात नमूद केले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
पतीला खांद्यावर बसवून गावकऱ्यांनी काढली महिलेची धिंड; अफेअरच्या संशयातून तालिबानी शिक्षा
शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन
तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच
चोराच्या उलट्या बोंबा! नेपाळ सरकारनं सीमेवरील घुसखोरीला सांगितलं वैध; ‘हा’ तर आमचाच भाग मग...
व्हायरल होणाऱ्या 'ब्लॅक पँथर'च्या फोटोमागची कहाणी; ती २० मिनिटं कशी होती? फोटोग्राफरनं सांगितलं...