शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Karti Chidambaram : कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयास सीबीआयने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 4:32 PM

Karti Chidambaram's close associates arrested by CBI :व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. भास्कर रमण असं या निटवर्तीयाचं नाव आहे. 

नवी दिल्ली : बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी सीबीआयने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि खासदार कार्ती चिदंबरम यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. काल सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. याप्रकरणी आता कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयने अटक केली आहे. व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. भास्कर रमण असं या निटवर्तीयाचं नाव आहे. 

सीबीआयने कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमणला रात्री उशीरा चेन्नईतून अटक केली. याच प्रकरणात सीबीआयने काल कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे टाकले होते. कार्ती चिदंबरम यांच्यासह अन्य चार जणांविरुद्ध चिनी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चिनी नागरिकांना बेकायदेशीर व्हिसा मिळवून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हे लोक चिनी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चिनी नागरिकांकडून लाच घेऊन गृह मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त लोकांना प्रोजेक्ट व्हिसा देत असत. तेही कार्ती चिदंबरम यांचे वडील केंद्रात मंत्री असताना. म्हणजेच वडिलांच्या पदाचा गैरवापर करून कार्ती चिदंबरम यांनी चिनी नागरिकांकडून ५० लाख रुपयांची लाच घेऊन व्हिसा उपलब्ध करून दिला.

वडिल मंत्री असताना 50 लाख घेऊन 263 नागरिकांना व्हिसा मिळवून दिलासीबीआयच्या म्हणण्यानुसार, कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या साथीदारांनी पंजाबमधील पॉवर कंपनीसाठी 263 चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कार्तीवर २०११ मध्ये ५० लाख रुपयांची लाच घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून दिल्याचा आरोप आहे. त्यावेळी कार्ती यांचे वडील पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते. एफआयआर नोंदवल्यानंतर, आज सकाळी सीबीआयच्या पथकाने दिल्ली आणि चेन्नई येथील चिदंबरम पिता-पुत्रांच्या निवासस्थानासह देशातील अनेक शहरांमध्ये 10 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआयला भास्कररामन यांच्या कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राइव्हमधून ५० लाख रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची काही कागदपत्रे सापडली होती. ज्याच्या आधारे सीबीआयने प्राथमिक चौकशी केली होती. प्राथमिक तपासाच्या निष्कर्षांमध्ये, एफआयआर नोंदवण्यासाठी प्रथमदर्शनी पुरेशी सामग्री होती.हा आरोप आहेसीबीआयने नोंदवलेल्या खटल्यात पंजाबमधील मानसा येथील तलवंडी साबो वीज प्रकल्पांतर्गत १९८० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार होता, असा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा हा प्लांट उभारण्यात आला तेव्हा तो एका चिनी कंपनीला आउटसोर्स करण्यात आला. हा प्रकल्प बराच काळ रखडला होता. विलंबामुळे कारवाई टाळण्यासाठी, मानसाने अधिकाधिक चिनी नागरिक आणि व्यावसायिकांना मानसा साईटवर आणण्यासाठी गृह मंत्रालयाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रकल्प व्हिसा मंजूर केला. सीबीआयने आरोप केला आहे की, वीज कंपनीचे प्रतिनिधी मखरिया यांनी कार्ती यांच्याशी त्यांचे निकटवर्तीय भास्कररामन यांच्यामार्फत संपर्क साधला.

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरमVisaव्हिसाchinaचीनCBIगुन्हा अन्वेषण विभागArrestअटक