मुंबई - कंपनीने पाच महिने पगार थकविला. त्यात, नोकरी सोडल्यानंतर कायदेशीर मार्गाने पगार मिळवलाही. मात्र कंपनीला धडा शिकविण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या कर्मचाऱ्याने कंपनीचे व्यवहार सुरू असलेल्या दोन वेबसाईट हॅक केल्याचा प्रकार माटुंगा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाला आहे. गुजरातमधून माटुंगा पोलिसांनी या कर्मचाऱ्याला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. दीपेश बुधभट्टी असे आरोपीचे नाव आहे.माटुंगा परिसरात असलेल्या तक्रारदार कंपनीचे गुजरातमध्येही एक युनिट आहे. तेथे दीपेश नोकरीला होता. एका संकेतस्थळावरून कंपनीचे आर्थिक व्यवहार सुरू होते. याची माहिती दीपेशला होती. गेल्या वर्षी कंपनीने त्याचा पाच महिन्यांचा पगार थकविला. त्याने नोकरी सोडून कायदेशीर मार्गातून पगार मिळविला. मात्र कंपनीला धडा शिकविण्यासाठी त्याने २३ मार्च ते १ आॅगस्टदरम्यान कंपनीच्या दोन्ही वेबसाईट हॅक केल्या. कंपनीचे कामकाज ठप्प झाल्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. १८ आॅगस्ट २०१८ रोजी कंपनीकडून माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान दीपेशचा प्रताप उघडकीस आला.
५ महिने पगार थांबवला म्हणून केली वेबसाईट हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 4:05 PM
दीपेश बुधभट्टी असे आरोपीचे नाव आहे.
ठळक मुद्देगुजरातमधून माटुंगा पोलिसांनी या कर्मचाऱ्याला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत.माटुंगा परिसरात असलेल्या तक्रारदार कंपनीचे गुजरातमध्येही एक युनिट आहे.१८ आॅगस्ट २०१८ रोजी कंपनीकडून माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.