केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका रशियन तरुणीने घराच्या छतावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या तरुणाने रशियन तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेली माहिती अशी, रशियन मैत्रिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी केरळमधील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी एका रशियन महिलेने तरुणाशी वाद घातल्यानंतर तिच्याच घरातून उडी मारली होती. या तरुणीवर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तरुण फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता तरुणाला पकडले असून, त्याची चौकशी सुरू आहे. रशियन महिलेशी संबंधित या प्रकरणात महिला आयोगाने पोलिसांकडून अहवालही मागवला होता. कतारमध्ये काम करणारी व्यक्ती व्यवसायाने अभियंता आहे. अघिल असे या व्यक्तीचे नाव सांगितले जात आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी तरुणाने सांगितले की, गेल्या आठवड्यात तो एका तरुणीशी मैत्रिणीसोबत कुराचुंडूजवळील त्याच्या घरी आला होता. तिथे त्याचा तरुणीशी वाद झाला. यानंतर तरुण तेथून फरार झाला होता.
दोघांमध्ये सतत वाद होत होते. यानंतर तरुणीने काही दिवसांपूर्वी घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती, यात ती जखमी झाली. सध्या या तरुणीवर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. तरुणाच्या घरातून गांजाचे पाकीट जप्त करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे, पोलिसांच्या चौकशीत अघिलने तरुणीचा पासपोर्ट फाडल्याचेही समोर आले आहे.
लिफ्टमधून येण्या-जाण्यावरुन तिघांनी केली तरुणाची धुलाई
रशियन वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला तिच्या देशात परत आणण्यासाठी जाण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अघिलसोबत केरळला पोहोचण्यापूर्वी रशियन महिलेने कतारलाही भेट दिली होती. मात्र, पोलीस एका संवादकाच्या मदतीने महिलेशी बोलून आरोपपत्र तयार करण्याची तयारी करत आहेत. रशियन तरुणीला इंग्रजी भाषा येत नसल्याने पोलिसांनाही अडचणी येत आहेत.