'बाबा, तुमचं म्हणणं बरोबर होतं', लग्नाच्या 7 महिन्यांनंतर वधूची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 09:53 AM2021-11-25T09:53:47+5:302021-11-25T09:55:04+5:30
Kerala : सुसाईड नोटमध्ये मोफियाने तिने आपल्या मृत्यूसाठी पती मुहम्मद सुहैल (Muhammad Suhail), सासरा युसूफ (Yusuf)आणि सासू रुखिया (Rukhiya)यांना जबाबदार धरले आहे.
कोच्ची : केरळमधील (Kerala) एडायपुरम (Edayapuram) येथील 21 वर्षीय लॉ कॉलेजची विद्यार्थिनी (Law Student) असलेल्या मोफिया परवीन दिलशाद (Mofiya Parveen Dilshad) हिने आत्महत्या केली आहे. मोफियाने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, 'बाबा, तुमचं म्हणणं बरोबर होतं. तो चांगला माणूस नव्हता'. साईड नोटमध्ये मोफियाने तिने आपल्या मृत्यूसाठी पती मुहम्मद सुहैल (Muhammad Suhail), सासरा युसूफ (Yusuf)आणि सासू रुखिया (Rukhiya)यांना जबाबदार धरले आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीने तिच्या खोलीत लावलेल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मुलीचा सासरच्या घरी खूप छळ झाला. मुलीचा पती, सासरा आणि सासूकडून छळ केला जात होता. याचबरोबर, काही दिवसांपूर्वी मोफियाने अलुवाच्या एसपीकडेही तक्रार केली होती.
त्यानंतर त्यांनी अलुवा पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर अलुवाचे सर्कल इन्स्पेक्टर सीएल सुधीर यांनी दोन्ही बाजूच्या मंडळींना पोलीस ठाण्यात बोलावले होते. अलुवा पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर सीएल सुधीर यांनी मोफियाचा पती मुहम्मद सुहैल आणि त्याच्या कुटुंबीयांची बाजू घेतली. यामुळे मोफिया निराश झाली आणि नंतर तिने गळफास लावून घेतला, असेही मोफियाच्या वडिलांनी सांगितले.
फेसबुकद्वारे दोघांची भेट
मोफिया आणि मुहम्मद सुहेल यांची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. ते काही दिवस सतत बोलत होते आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर याच वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले. मोफियाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या वेळी मुहम्मद सुहैलने सांगितले होते की तो संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये काम करतो. ती एक ब्लॉगर देखील आहे. पण लग्नानंतर सुहैलने सांगितले की, त्याला चित्रपट निर्माता बनायचे आहे. यासाठी त्याने मोफियाकडे हुंडा म्हणून 40 लाख रुपये मागितले. हुंडा देण्यावर मोफियाचा विश्वास नव्हता, म्हणून तिने नकार दिला. त्यानंतर सासरच्या घरात मोफियाचा छळ होत होता.
मुहम्मद सुहैल पोलिसांच्या ताब्यात
मुहम्मद सुहैल आणि त्याच्या पालकांना कोठमंगलम पोलिसांनी बुधवारी, 24 नोव्हेंबरला ताब्यात घेतले आहे. कारण मोफियाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्याचे नाव होते. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, इन्स्पेक्टर सीएल सुधीर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सर्कल इन्स्पेक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अलुवाचे आमदार अन्वर सदाथ पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत आहेत.