केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, यावेळी तो तरुणीच्या नातेवाईकांना सापडला. नातेवाईत त्याला मारहाण करतात. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना केरळमधील आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर मारहाणीनंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केले. ही घटना केरळमधील त्रिशूर परिसरातील आहे. तो तरुण ३३ वर्षाचा आहे. तो एका खासगी बसचा चालक म्हणून काम करत होता. या प्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींची ओळख पटल्याचे माहिती पोलिसांनी दिली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली असून २१ फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहार असे मृताचे नाव आहे. पीडितेवर झालेल्या हल्ल्याचा कथित व्हिडीओ जवळच्या मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, सहार गर्लफ्रेंडच्या घरातून बाहेर पडताना दिसला आणि काही लोकांनी त्याची चौकशी केली. यानंतर त्यांनी सहारला मारहाण करायला सुरुवात केली, त्यानंतर सहार घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आठवडाभरातच सहारची प्रकृती खालावली होती, असे अहवालात म्हटले आहे. त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. मंगळवारी दुपारी डॉक्टर त्याच्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार करत होते, यावेळी त्याचा मृत्यू झाला.