शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

केरळ पोलिसांनी तीन कोटींचे सोने चोरणाऱ्यास साताऱ्यात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2021 9:19 PM

केरळ राज्यातील एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी रात्री केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार जणांना साताऱ्यातून ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केरळ राज्यातील एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी रात्री केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार जणांना साताऱ्यातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांना केरळ येथे नेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, केरळ पोलिसांत एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे सोने चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास केरळ पोलीस करत होते. तांत्रिक तपासात नाशिक येथील निक जोशी या युवकाचा या गुन्ह्यात समावेश असून तोच मुख्यसूत्रधार असल्याचे समोर आले. त्यानुसार केरळ पोलिसांनी नाशिकवर लक्ष केंद्रीत केले, मात्र संशयित जोशी हा वारंवार जागा बदलत होता.गेले काही दिवस नाशिकचा जोशी साताऱ्यात आल्याची माहिती केरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार केरळ पोलिसांचे एक पथक शुक्रवारी सकाळी सातारा येथे दाखल झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती तसेच संशयित जोशी सातारा परिसरात असल्याचे सांगितले. यानुसार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना केरळ पोलिसांना मदत करण्याचा सूचना केल्या.

यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे मुनीर मुल्ला, मंगेश मोहिते, शिवाजी भिसे, वैभव सावंत यांना केरळ पोलिसांच्या मदतीला देण्यात आले. शोध घेताना नाशिक येथील संशयित जोशी हा साताऱ्यात महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका हॉटेलमध्ये आपल्या दोन साथीदारांसह तसेच कोरेगाव तालुक्यातील एका मित्रासमवेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत जोशी व त्याच्या सातारा व कोरेगाव येथील तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले.ताब्यात घेतल्यानंतर सातारा येथे प्राथमिक चौकशी करून त्या चौघांना केरळ पोलिसांनी केरळ येथे नेले.पोलिसांनी त्यांच्याकडून एक महागडी चारचाकी देखील जप्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी