शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

ओएलएक्सवर जाहिरात पाहून चोरांनी कार पळविली; पोलिसांनी ग्राहक बनत परत केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 7:50 PM

केरळमधील एका व्यक्तीने त्याची नवीन मॉडेलची स्विफ्ट कार विक्रीस काढली होती.

सध्या ऑनलाईन साईटवर वापरलेल्या गाड्या, मोबाईल विकण्यात येत आहेत. मात्र, याद्वारे फसवणुकीचे प्रकराही वाढले आहेत. केरळमध्ये नवीन घेतलेली कार विकणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले होते. मात्र, पोलिसांनी युक्ती लढविल्याने त्याला कार पुन्हा मिळाली आहे. 

केरळमधील एका व्यक्तीने त्याची नवीन मॉडेलची स्विफ्ट कार विक्रीस काढली होती. यासाठी त्याने OLX वर माहिती टाकली होती. चोरांनी या व्यक्तीशी संपर्क साधला आणि गाडी खरेदी करणार असल्याचे सांगितले. खेरदीच्या बहाण्याने आलेल्या चोरांनी व्यवहार पक्का करण्याआधी कारची टेस्ट ड्राईव्ह करायची असल्याचे सांगितले. तसेच मालकाला कारमध्ये न बसवताच कार घेऊन पसार झाले. यामुळे मालकाने याची तक्रार पोलिसांकडे केली. 

चोरांनी लगेचच कारची नंबरप्लेट बदलली तसेच जीपीएसही काढून टाकले. यानंतर चोरांनी ही कार वायनाडच्या एका व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कागदपत्रांवरून संशय आला आणि त्याने कारचे मूळ नोंदणी पत्र मिळविले. यानंतर त्याने त्यावरील नंबरवर फोन करत पोलिसांनाही माहिती दिली. 

पोलिसांनी शक्कल लढवत या चोरांशी संपर्क साधला. तसेच कार खरेदी करणार असल्याचे सांगितले. ग्राहक बनलेल्या पोलिसांनी त्यांचा पत्ताही वेगळा सांगितला. तसेच कार दाखविण्यासाठी निलेश्वरमला यायला सांगितले. यावर हे दोन्ही चोर ती कार घेऊन निलेश्वरला पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

काही महिन्यांपूर्वी बंगळुरु पोलिसांनीही असाच बाईकचोर पकडला होता. त्याने टेस्ट ड्राईव्ह करण्याच्या बहाण्याने बाईक पळविली होती. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीPoliceपोलिसKeralaकेरळ