आईची अब्रू वाचवण्यासाठी अल्पवयीन मुलींनी केली एकाची हत्या, नंतर पोलिसांकडे केलं सरेंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 12:32 PM2021-12-30T12:32:58+5:302021-12-30T12:33:53+5:30

Kerala Crime News : या घटनेनंतर मुलींनी आणि तिच्या आईने पोलिसांसमोर सरेंडर केलं. मुली आणि त्यांची आई मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या घराजवळ एका घरात राहत होती.

Kerala : Two minor girls kill mothers attacker in wayanad surrender | आईची अब्रू वाचवण्यासाठी अल्पवयीन मुलींनी केली एकाची हत्या, नंतर पोलिसांकडे केलं सरेंडर

आईची अब्रू वाचवण्यासाठी अल्पवयीन मुलींनी केली एकाची हत्या, नंतर पोलिसांकडे केलं सरेंडर

googlenewsNext

आपल्या आईची अब्रू वाचवण्यासाठी दोन अल्पवयीन मुलींना एका ७० वर्षीय वयोवृद्धाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं आहे. असं सांगितलं जात आहे की, या व्यक्तीने अल्पवयीन मुलींच्या आईचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यानंतर मुलींनी हे पाउल उचललं. ही घटना केरळच्या (Kerala Crime News) वायनाड जिल्ह्याच्या अइरमकोल्ली येथील आहे. पोलिसांनी दोन्ही मुलींना शेल्टर होममध्ये ठेवलं आहे.

आईलाही केली अटक

पोलिसांनी हत्येप्रकरणी मुलींच्या आईला सुद्धा अटक केली आहे. ज्या व्यक्तीची हत्या झाली आहे तो मुलींचा नातेवाईक आहे. या घटनेनंतर मुलींनी आणि तिच्या आईने पोलिसांसमोर सरेंडर केलं. मुली आणि त्यांची आई मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या घराजवळ एका घरात राहत होती.

पोत्यात भरलेला मृतदेह

पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह एका प्लॉटमध्ये आढळून आला.  मृतदेह एका पोत्यात भरून खड्ड्यात ठेवला होता. पोलिसांनी सांगितलं की, मुली ज्यांचं वय  १५ आणि १६ आहे त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही मुलींना जुवेनाइल कोर्टात हजर केलं गेलं. 

डोक्यावर आणि गळ्यावर केले वार

पोलिसांना देण्यात आलेल्या जबाबात मुलींनी सांगितलं की, दिवसा ११ वाजता वयोवृद्ध व्यक्तीने त्यांच्या आईचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनुसार, लैंगिक शोषणापासून बचाव करण्यासाठी मुली आणि त्यांच्या आईने संघर्ष केला. यानंतर मुलींनी व्यक्तीवर हल्ला केला. त्याच्या गळ्यावर आणि डोक्यावर वार करत त्याचा जीव घेतला.
 

Web Title: Kerala : Two minor girls kill mothers attacker in wayanad surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.