शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Ketaki Chitale : केतकी चितळेला दिलासा नाहीच, कोर्टाने जामीन अर्जावरील निर्णय ठेवला राखून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 18:37 IST

Ketaki Chitale : तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्ट निर्णय देणार आहे. 

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाणे न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेतला आहे. तर दुसरीकडे ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या जामीन अर्जावर सुनावणी आज दुपारी सुरु झालाय. मात्र, केतकी चितळेला दिलासा मिळालेला नाही. केतकीच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला आहे. तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्ट निर्णय देणार आहे. 

शरद पवार यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे हिची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. तिच्या बाबतीत या पूर्वीच मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी ताबा मागितल्यावर त्यांना ताबा दिला होता. पोलिसांना केतकीच्या जामिनाबाबत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सांगावे असं न्यायालयाने सांगितलं आहे. तोपर्यंत जामीन अर्जावर सुनावणी होणार नव्हती. केवळ सायबर कलम ६६ अ अन्वये युक्तिवाद  झाला आहे. केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी बाजू मांडली. 

केतकी चितळेची जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी सुरु असून तिला डोकेदुखी आणि फिटचा त्रास असल्याने जे जे रुग्णालयात आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याचा अहवाल घेऊन केतकीला पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करू शकतात. मात्र, आज तरी ठाणे कोर्टाकडून केतकीला दिलासा मिळाला नसून तिच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेthaneठाणेCourtन्यायालयJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालयSharad Pawarशरद पवार