शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

बिहारमधून अपहरण केले, यूपी, राजस्थानमध्ये विकले, तीन वर्षांनंतर बहिणीला भावाने शोधून काढले

By बाळकृष्ण परब | Published: February 19, 2021 11:47 AM

Crime News : महिलांवर होणारे अत्याचार ही आपल्या देशातील मोठी समस्या आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या बातम्या दररोज येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - महिलांवर होणारे अत्याचार ही आपल्या देशातील मोठी समस्या आहे. (Crime News) महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या बातम्या दररोज येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचे ती अल्पवयीन असताना अपहरण झाले. त्यानंतर तिच्याच चारित्र्यावर संशय घेत पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना सहकार्य करणे टाळले. (Brother-Sister) दरम्यानच्या तीन वर्षांच्या काळात तिची विक्री झाली. अखेर तीन वर्षांच्या शोधानंतर ती सापडली तेव्हा ती कुमारीका माता बनली होती. जेव्हा तिची भावासोबत भेट झाली तेव्हा बहीण भावाचे अश्रू अनावर झाले. (Kidnapped from Bihar, sold in UP, Rajasthan, sister found by brother three years later)मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीचे बिहारमधील जहानाबाद येथून ती अल्पवयीन असताना २०१८ मध्ये अपहरण झाले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत आरोपींची नावेही सांगिलती होती. आरोपींच्या गँगमध्ये एक महिलाही होती. ही गँग महिलांचे अपहरण करून त्यांची विक्री करत असे. या गँगमधील महिलेनेच या तरुणीचे अपहरण करून तिला उत्तर प्रदेशमधील नोएडा आणि राजस्थानमधील दौसापर्यंत पाठवले. 

मात्र या प्रकरणाच्या तपासामध्ये बिहार पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. उलट तुमची मुलगी प्रेमात पडून पळून गेली, असे सांगून तिच्या कुटुंबीयांना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबाने आपल्या मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत. त्यांनी आपल्या पातळीवर कॉल डिटेल आणि मोबाइलचे लोकेशन ट्रेस करत प्रयत्न सुरू ठेवले. 

दरम्यान, आपली बहीण राजस्थानमधील दौसा येथे असल्याचे समजल्यावर तिचा भाऊ पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांना घेऊन ते दौसा येथे पोहोचले. त्यानंतर दौसामधील सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने गांगल्यावास गावात जात पीडित तरुणीला ताब्यात घेतले. आपल्या बहिणीची अवस्था पाहून भावाचे अश्रू अनावर झाले. या तरुणीचा विवाह झाला नाही. मात्र तिला दोन मुले झाली. या तीन वर्षांच्या काळात तिची अनेक ठिकाणी विक्री झाली. 

आता महिलेचा शोध लागल्यानंतर पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या महिलेची कुठे कुठे विक्री करण्यात आली. तसेच तिचे खरेदीदार कोण कोण होते याचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश