लॉस एंजल्स - अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथं पंजाबच्या ज्या कुटुंबाचं अपहरण झालं होतं त्या ४ सदस्यांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे. या मृतांमध्ये ८ महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. ही घटना अतिशय भयंकर आणि हादरवणारी आहे असं मर्स्ड काउंटी शेरिफ वर्न वार्नके यांनी म्हटलं. ३ ऑक्टोबरला दक्षिण हायवेवरून या चौघांचं अपहरण करण्यात आले होते असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबाचा अमेरिकेत स्वत:चा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता. हे कुटुंब पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील हरसी गावात राहणारं होते. या प्रकरणी कॅलिफोर्निया पोलिसांनी ४८ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले होते. या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. अद्यापही अपहरण केलेल्या लोकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मर्स्ड काउंटीच्या एटीएममध्ये पीडित कुटुंबाच्या बँक कार्डचा वापर झाल्याचं समोर आले. अधिकाऱ्यांनी चौकशी करून तिथे गेले असता अपहरण कर्त्यांनी पुरावे मिटवण्यासाठी ट्रकाला आग लावल्याचं दिसून आले.
काय आहे प्रकरण?सेंट्रल व्हॅलीतील रहिवासी असलेल्या या कुटुंबाचे मर्केल काउंटीतील एका व्यावसायिक ठिकाणाहून सोमवारी अपहरण करण्यात आले. आरोही (८ महिने), तिची आई जसलीन कौर (२७), वडील जसदीपसिंग (३६) व काका अमनदीपसिंग (३९) अशी अपह्रतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले होते की, संशयित हे अत्यंत धोकादायक आणि सशस्त्र आहेत. या प्रकरणीचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने त्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र ४ जणांचं जबरदस्तीने साऊथ हायवे ५९ च्या ८०० ब्लॉक येथून अपहरण करण्यात आलं होतं. या कुटुंबाचं रिटेलर्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, अशा भागातून अपहरण करण्यात आलं आहे. यापूर्वी २०१९ मध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत भारतीय वंशाचे व्यावसायिक तुषार अत्रे हे त्यांच्या गर्लफ्रेंडच्या कारमध्ये मृतावस्थेत सापडले होते. ते एका डिजिक मार्केटिंग कंपनीचे मालक होते. त्यांचे कॅलिफोर्नियामधील त्यांच्या आलिशान घरातून अपहरण करण्यात आले होते.