ठळक मुद्दे बराच वेळ मुली परतल्या नसल्यामुळे मुलींच्या मामाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.१९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो आग्रीपाडा परिसरातच राहणार आहे. त्या दोघींचं लैंगिक शोषण करण्यात आलेले नसल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.
मुंबई - मुंबई सेंट्रल परिसरात मामाकडे राहणाऱ्या ७ आणि ५ वर्षाच्या दोन बहिणींना काल सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने चॉकलेट देतो म्हणून घेऊन गेला होता. मात्र, बराच वेळ मुली परतल्या नसल्यामुळे मुलींच्या मामाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीअपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलींच्या शोध सुरु केला. त्यांनतर मुंबई सेंटर परिसरातील एका सीसीटीव्हीत या दोन बहिणींना एक व्यक्ती हाताला पकडून घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांना गिरगावात या बहिणी सापडल्या. या बहिणींची नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्या दोघींचं लैंगिक शोषण करण्यात आलेले नसल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. तसेच पुढे ते म्हणाले १९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो आग्रीपाडा परिसरातच राहणार आहे.
आग्रीपाडा पोलिसांनी सोशल मीडियाची मदत घेऊन बहिणींच्या अपहरणाबाबत मेसेज वायरल केला. दरम्यान, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही बहिणी गिरगाव परिसरात सापडल्या. पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्यांना प्रथम वैद्यकीय तपासणीसाठी नायर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आग्रीपाडा पोलिसांनी दोन्ही बहिणांना घेऊन जाणाऱ्या १९ वर्षीय आरोपी तरुणाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी कऱण्यात येत आहे. अपहरण कऱण्यात आलेल्या दोन्ही बहिणीची आई क्षयरोगाने ग्रस्त असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलींचा सांभाळ करण्यासाठी दोघींना मजुरी करत असलेल्या मामाकडे ठेवण्यात आले होते.