इस्लामाबाद - पाकिस्तानातील कराचीमध्ये एका ट्रान्सजेंडर कार्यकर्त्यासोबत अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे. जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, ड्युटीवरून परतणाऱ्या ट्रान्सजेंडरचे काही लोकांनी आधी अपहरण केले. त्यानंतर तिला झुडपात नेऊन लैंगिक अत्याचार केले. ही घटना ११ डिसेंबरची आहे. मंगळवारी या सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.अहवालानुसार, पाकिस्तानी ट्रान्सजेंडर कार्यकर्ते कामगार वर्गाच्या वस्त्या आणि बाजारपेठा उद्ध्वस्त होऊ नयेत यासाठी मोहीम राबवत होते. क्लायमेट मार्च नावाची मोहीम आयोजित करण्याच्या एक दिवस आधी, तिचे अपहरण करून अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. शहरातील कराची बचाओ तहरीक (केबीटी) च्या बॅनरखाली 'पीपल्स क्लायमेट मार्च'च्या आयोजकांनी रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या मोर्चाची माहिती मिळवण्यासाठी आलेल्या काही लोकांनी शनिवारी या मोर्चाच्या आयोजकाचे अपहरण केले आणि दुष्कर्म केले. केबीटीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोर्चाच्या एक दिवस आधी संघटनात्मक बैठकीनंतर कार्यकर्ता नाझिमाबाद येथील आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. केबीटीने आरोप केला की, पीडितेविरुद्धच्या हिंसाचारात पोलिसांचा सहभाग होता. जेंडर इंटरएक्टिव एलायंस (जीआईए)मधील ‘हिंसा प्रकरणातील व्यवस्थापक’ शहजादी राय यांनी मीडियाला सांगितले की, केबीटी कार्यकर्ता खूप घाबरली होती आणि तक्रार करू इच्छित नाही.
सरकारने चौकशीचे आदेश दिलेसिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटनुसार, शहा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि पोलीस महानिरीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मानवाधिकार मंत्रालयानेही या घटनेची दखल घेतली आणि सांगितले की, समलिंगी अधिकार तज्ञ पीडितेच्या पालकांच्या संपर्कात आहेत.