शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

बापरे! ५० लाखांची खंडणी न दिल्यानं विद्यार्थ्याला जिवंत जाळलं, मुख्यमंत्र्यांच्याच गावात धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:15 PM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करत असले तरी त्यांच्याच गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नालंदा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करत असले तरी त्यांच्याच गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालंदा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं होतं आणि ५० लाखांची खंडणी न दिल्यानं अपहरणकर्त्यांनी विद्यार्थ्याला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. १६ ऑक्टोबर रोजी बिहार ठाणे हद्दीतून विद्युत विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. 

मुसादपूर येथील रहिवासी कर्मी उर्मिला देवी यांनी त्यांचा २० वर्षीय मुलगा नितीश याचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. चौकशी दरम्यान, पोलिसांनी शाळेच्या संचालकांसह दोन संशयितांना ताब्यात घेतलं होतं. अपहरणकर्त्यांनी मंगळवारी सोहसरायच्या आशानगर येथील मदर तेरेसा शाळेच्या परिसरातून पोलिसांना हत्या प्रकरणाचे पुरावे हाती लागले. अपहरणकर्त्यांनी नितीश याला चक्क जीवंत जाळलं आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन नदीत टाकून दिले. अटकेत असलेला शाळेचा संचालक दीपक कुमार उर्मिला देवी यांचाच कुटुंबिय असल्याचीही माहिती समोर आली आहे.

इतर आरोपींचा शोध सुरूडीसीपी शिब्ली नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या परिसरात हत्येसंदर्भात पुरावे हाती लागले. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं व संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपींनी तरुणाला जीवंत जाळलं आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन नदीत टाकले. या घटनेशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यासंदर्भात छापेमारी सुरू आहे. 

१६ ऑक्टोबरपर्यंत ५० लाखांच्या खंडणीची केली होती मागणीउर्मिला देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी नितीशनं त्याला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरुन एक टेबल मागवायचा होता म्हणून १५० रुपये देऊन मी कामावर निघाले. संध्याकाळी घरी पोहोचले तेव्हा नितीश घरी नव्हता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्यानं त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर मोबाइलही स्विच ऑफ येऊ लागला. मध्यरात्री नितीशच्या मोबाइलवर एक फोन कॉल आला आणि खंडणीची मागणी केली गेली. नितीशचं अपहरण करण्यात आलं असून ५० लाख दिले नाहीत तर त्याला ठार करु अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार