शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सीबीआयच्या तोतया टोळीकडून गुऱ्हाळ चालकाचे अपहरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:17 PM

दौंड ताालुक्यातील दापोडी येथील गुळाच्या गुऱ्हाळावर सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून गुहाळ चालकाला पकडून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना घडली आहे. 

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाखाची खंडणी घेऊन पोबारासहा तासात यवत पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा

दौंड (यवत): दौंड ताालुक्यातील दापोडी येथील गुळाच्या गुऱ्हाळावर सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून गुहाळ चालकाला पकडून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना घडली असून याप्रकरणी यवत पोलिसांनी तोतया टोळीतील एकाला अटक केली असून त्यांची स्कॉर्पिओ जीप देखील जप्त केली आहे.          याबाबतची अधिक माहिती अशी की , काल (दि.५) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दापोडी (ता.दौंड) येथील युवराज जिजाबा रुपनवर यांच्या गुहाळवर स्कॉर्पिओ जीप (क्र.एम.एच.४२ , ए. एस.८५५४) मधून सहा जण आले.यावेळी तेथे गुऱ्हाळ  चालविणारे चालक नशीब कुरबान मलिक (वय -३२) हे होते.आलेल्या इसमांनी ते सीबीआयचे लोक असून गुळावर गुऱ्हाळा ऐवजी दारू बनविली जात असल्याची माहिती मिळाली असून तुमच्याकडे चौकशी करायची आहे , असे सांगितले.याचबरोबर फिर्यादी नशीब मलिक व मोहन माणिक रुपनवर यांना ताब्यात घेत जीपमध्ये बसविले.यावेळी सदरच्या जीप नेमकी कुठे जाते आणि हे पाहण्यासाठी काही ग्रामस्थ मागे गेले असता त्यांनाही आरोपींनी गाडी रस्त्यात थांबवून मारहाण करत पाठवून दिले.यानंतर गाडी पाटस येथे घेऊन गेले , फिर्यादी नशीब मलिक यांच्याकडून कारवाई न करण्यासाठी ८० हजार रुपये व साथीदार याच्याकडून १८ हजार रुपये घेऊन त्यांना तेथेच सोडून तोतया टोळी निघून गेली.मात्र, या सर्व प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दिली.  पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस  निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली.यावेळी गुन्ह्यात वापरलेल्या जीपच्या क्रमांकावरून जीप मालकाचा शोध घेतला.यावेळी गाडी मालक व गाडी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता सहा आरोपींनी गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली यावेळी यातील तीन आरोपींना निष्पन्न करून एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे.पोलिसांनी अवघ्या सहा तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.

   सहाय्यक पोलोस निरीक्षक विनायक देवकर , पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे, पोलीस नाईक संदीप कदम , महेश बनकर, गणेश पोटे, दशरथ बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल गजरे, विनोद रासकर, उत्तप्पा संकुल, प्रशांत कर्णावर यांनी कारवाईत सहभाग घेतला असून उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे...................गुन्ह्यात खंडणीचे कलम नाही .....   सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी गुऱ्हाळचे चालक नशीब मलिक व त्यांचे एक सहकारी रुपनवर यांना गुऱ्हाळवर दारू बनविली जात असल्याचे सांगत ताब्यात घेतले , तेथून अपहरण करून त्यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जोर जबरदस्तीने पाटस येथे नेऊन त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केली. यवत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची सूत्रे वेगाने फिरविली व गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जीप सह एका आरोपीला अटक करून आणखी तीन आरोपी निष्पन्न केले.मात्र यातील घटनेचा गुन्हा दाखल करताना आरोपींनी सरकारी अधिकारी असल्याचे भासवित एक प्रकारची खंडणी वसूल केली असताना देखील गुन्ह्यात खंडणीचे कलम मात्र लावलेले नव्हते यामुळे दापोडी परिसरातील उपस्थित ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी