मुंबईत स्थायिक करण्याची बतावणी करून उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीचे अपहरण  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 06:57 PM2018-10-17T18:57:49+5:302018-10-18T19:30:35+5:30

मध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून केली सुटका, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या मदतीने आरपीएफची कारवाई  

The kidnapping of a highly educated family by pretending to settle in Mumbai | मुंबईत स्थायिक करण्याची बतावणी करून उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीचे अपहरण  

मुंबईत स्थायिक करण्याची बतावणी करून उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीचे अपहरण  

Next

मुंबई - व्हॉटस अ‍ॅप ग्रुप बनवून 'गुड मॉर्निंग, गुड नाइट' असे मेसेज पाठवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामात ग्रुपचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमाने रेल्वे सुरक्षा बलाच्या मुंबई सेंट्रल स्थानकातील निरीक्षक सत्यजित पवार यांनी उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीची मुंबईत स्थायिक होण्याचे आमिष दाखवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या तावडीतून सोमवारी सुटका केली. अल्पवयीन जोडपं मध्य प्रदेशमधील असून मुलगी घरातून २ लाख रुपये घेऊन मुंबईला पळून आल्याचे धक्कादायक वास्तव चौकशीत समोर आले आहे.
मध्य प्रदेश येथील सुखवस्तू कुटुंबात १७ वर्षीय शिवानी (बदलेले नाव) ही राहत होती. याच परिसरात ओमकार (बदलेले नाव) हा १७ वर्षीय तरुण देखील राहत होता. गेल्या वर्षभरापासून यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले. येत्या सहा महिन्यात माझे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर आपण लग्न करून मुंबईत सेटल होऊ, असे आमिष ओमकारने शिवानीला दिले. यावेळी तिला घरातून २ लाख रुपये घेऊन येण्याचे देखील सांगितले.
८ आॅक्टोबरला ओमकार शिवानीला घेऊन मध्य प्रदेश येथून पळाला. शिवानीच्या घरच्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात अपहरणाची तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांनी संबंधित तरुणाचे फोटो आणि महिती रेल्वे सुरक्षा बलाच्या व्हॉटस अँप ग्रुपवर पाठवले. त्याच बरोबर अमृतसर एक्स्प्रेसने रविवार-सोमवारच्या मध्यरात्री मुंबईला येणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी आरपीएफला दिली. मुंबई सेंट्रल स्थानकातील पवार यांनी सूरत, बोरीवली आणि मुंबई सेंट्रल येथील आरपीएफच्या व्हॉट्स अप ग्रुपवर संबंधितांची माहिती आणि फोटो पाठवले. रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबई विभागातील सर्व रेल्वे स्थानकांना अलर्ट दिला. याचदरम्यान सीसीटीव्हीत जॅकेट घातलेला मुलगा आणि घाबरलेल्या अवस्थेत मुलगी मुंबई सेंट्रल स्थानकात दिसली. आरपीएफ निरीक्षक पवार आणि टिमने दोघांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती मध्य प्रदेश येथून पळून आल्याची माहिती दोघांनी दिली. मुलीकडून रोख एक लाख ५५ हजार रुपये देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आरपीएफने दिली.

अल्पवयीन मुलगी ही मध्य प्रदेश येथे राहणारी आहे. मुलीचे वडील मध्य प्रदेश येथील नामांकित महाविद्यालयात प्राचार्य आहेत. मुलीच्या घराच्या परिसरात अल्पवयीन मुलगा राहत असून तो कोणतेही शिक्षण घेत नाही.
- सत्यजीत पवार, निरीक्षक, मुंबई सेंट्रल, आरपीएफ  

Web Title: The kidnapping of a highly educated family by pretending to settle in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.