मुंबई : शिवाजीनगर पोलिसांनी एका ७ वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. तसेच मुलाचीही नालासोपाऱ्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने स्थानिक परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी दोन महिन्यापूर्वी विवाह केला. तिला पहिल्या पतीपासून मुले आहेत आणि ती लग्न झाल्यावरपण नांदायला येत नव्हती. या रागात तिला धडा शिकवण्यासाठी तिच्या दुसऱ्या पतीने तिच्या सात वर्षाच्या मुलाचे अपहरण केले.
याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने मुलाचा शोध सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये अपहरणकर्ता पोलिसांना दिसला. दरम्यान महिलेच्या दुसऱ्या पतीची चौकशी केली गेली जी पोलिसांना माहिती देत नव्हता. मात्र अखेर त्याने अपहरणाची कबुली दिली. नालासोपारा परिसरात मुलगा त्याचा हात सोडून पळाला आणि स्थानिकांनी त्याला नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले. अवघ्या २४ तासात रजाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली