डोंबिवली: पैशांच्या देवाण-घेवाण वरून झालेल्या वादात एका शिपींग एजंटने दोघांच्या सहाय्याने 65 वर्षीय शिपींग एजंटचे अपहरण केल्याची घटना 1 जानेवारीला घडली होती. दरम्यान या गुन्हयातील आरोपींना अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. अपहत शिपींग एजंटची नालासोपारा येथील गोराई नाक्याजवळील एका हॉटेलमधून सुखरूप सुटका करण्यात आली.
डोंबिवली पुर्वेतील स्टार कॉलनी परिसरात राहणारे शुभाशिष बॅनजी (वय 65) हे शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव (वय 25)नावाच्या शिपींग एजंटने तीन तरु णाना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रु पये दिले होते. बॅनर्जी याने तरु णांसाठी काम शोधले. त्यांचा व्हीसा तयार केला. यासाठी मनजीत याने दिलेले पैसे खर्च झाले. त्या तीन तरु णांची श्रीलंकेस जाण्याकरीता तारीख देखील निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आले. 15 दिवस क्वारंटाईन असल्याने व्हिसाची मुदत संपली. यावर मनजीतकडून शुभाशिष यांना दिलेल्या पैसे माग्ण्यास सुरु वात केली. बॅनर्जी यांनी सर्व पैसे खर्च झाले असे त्याला सांगितले परंतू मनजीतने पैशांचा तगादा सुरूच ठेवला.
पैसे मिळत नसल्याने मनजीतने धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांच्या मदतीने बॅनर्जी यांचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्र ार दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करु न पाच लाख रु पयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकीही देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच मोबाईल लोकेशन द्वारे तपास सुरु झाला. नाला सोपारा येथील गोराई नाकाजवळील एका हॉटेलमधून बॅनर्जी यांची सुटका केली. पोलिसांनी मनजीतसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. तिघे आरोपी उत्तर प्रदेशात राहणारे आहेत.