पिंपरी :समरसता पुनुरूथ्थान संस्थेच्या माध्यमातुन चालविण्यात येणाऱ्या गुरुकुलम या चिंचवडगावातील आश्रमातुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने मुलींना फूस लावुन पळवुन नेले असावे, अशी फिर्याद सतिश रामभाऊ अवचर यांनी चिंचवड पोलिसांकडे दिली आहे. १२ आणि ८ वर्ष वयाच्या मुलींचे १५ डिसेंबरला अपहरण झाले असून रविवारी फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव येथील गावडे तलावाजवळ गुरूकुलम नावाचा आश्रम आहे. माता, पित्याकडून योग्य प्रकारे सांभाळ होत नसलेली मुले,अनाथ मुले या आश्रमात आहेत. एका आठ वर्षाच्या आणि एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. कोणीतरी त्यांना फूस लावुन पळवुन नेले आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत इंद्रायणीनगर येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना, गुरुकुलम आश्रमातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने आश्रमातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
चिंचवडमधील गुरुकुलम आश्रमातुन दोन मुलींचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 1:43 PM
माता, पित्याकडून योग्य प्रकारे सांभाळ होत नसलेली मुले,अनाथ मुले या आश्रमात आहेत.
ठळक मुद्देघटनेने आश्रमातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर