सोलापूर : लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेलेल्या तरूणासह अल्पवयीन बालिकेस ग्रामीण पोलिसांनी सुरत (राज्य - गुजरात) येथून ताब्यात घेतले. आरोपी हा गुजरातमधील एका कंपनीत काम करीत होता. कंपनीत जावून पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने यशस्वीपणे बजाविली.
लग्नाचे अमिष दाखवून फुस लावनू १० नोव्हेंबर २०२१ रोजी तरूणाने अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. त्यानंतर करमाळा पोलिस ठाण्यात २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पिडित बालिका व आरोपी यांचा शोध घेऊनही ते मिळून येत नव्हते. त्यामुळे हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे २४ जून २०२२ रोजी वर्ग केला होता. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक व कसोशीने करून १७ मार्च रोजी पिडित बालिका व आरोपीस सुरत (रा. गुजरात) येथून ताब्यात घेतले. त्यानंतर करमाळा पोलिस ठाण्यात हजर केले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पेालिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रभारी उपअधीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोतीराम मोरे, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल सविता कोकणे, पोलीस हवालदार सुर्यकांत जाधव, सचिन वाकडे, लक्ष्मण राठोड, प्रिती पाटील यांनी कामगिरी केली.