- प्रदीप भाकरेअमरावती - जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकवता शिकवता एक ऊर्जा निर्माण करू शकतो. तो गुरू होण्याच्या प्रक्रियेला सुरवात करतो. ही ऊर्जा असते ‘तू करू शकतो’ या मानस प्रक्रियेची... भारतीय तत्त्वज्ञानात शिक्षकाला असे अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, त्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम मोर्शी येथील एका ४३ वर्षीय शिक्षकाने केले आहे. ‘त्या’ पवित्र नात्याला मार गोळी; आता रिलेशनमध्ये येऊ! असे म्हणाणाऱ्या शिक्षकाचे ते वेगळे रूप पाहून ती नखशिखांत हादरली. मनाचा हिय्या करत तिने १८ ऑक्टोबर रोजी वरूड पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरूध्द तक्रार दाखल केली.
प्रवीण कृष्णराव धोटे (४३, रा. महादेव कॉलनी, मोर्शी) असे त्या आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याच्याविरूध्द वरूड पोलिसांनी विनयभंग, पोक्सो व ॲट्रासिटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. यातील १६ वर्षीत पिडिता ही विद्यार्थीनी असून, आरोपी हा पेशाने शिक्षक आहे. ती वरूड येथे शिक्षण घेत असताना तिची आरोपीशी ओळख झाली. दरम्यान आरोपीने यंदा तिची ॲडमिशन अमरावतीच्या तंत्रनिकेतन विद्यालयात करून दिली. त्यामुळे दोघांमध्ये संवाद देखील वाढला. मात्र त्या थोराड शिक्षकाने चुकीचा अर्थ घेतला. दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी ती वरूड बसडेपोत असताना आरोपीने तिच्या मोबाईलवर कॉल केला.
म्हणाला खुप आवडतेसआपल्यापेक्षा तब्बल १७ वर्षांनी लहान असलेल्या त्या मुलीला त्याने कॉल करून आता आपल्यातील शिक्षक विद्यार्थीनीचे नाते संपवून टाकू. मला तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायचे आहे, असा तो बरळला. खुप आवडतेस, तुझ्यासोबत बोलायचे आहे, असेही तो म्हणाला. त्यानंतर देखील वारंवार कॉल करून त्याने तिला त्रास दिला. व्हॉटसॲपवर चॅट करून देखील तिचा विनयभंग करण्यात आला. त्या असहय जाचाला कंटाळून अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौेगावकर हे करीत आहेत.