१ कोटीसाठी ‘त्याने’ असा कांड केला; पोलिसांनी बाजारात फिरताना पकडला मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 11:43 AM2021-11-09T11:43:02+5:302021-11-09T11:43:25+5:30
पैशाच्या लालसेपोटी या व्यक्तीला मरावं लागलं. हे वाचून आता तुम्हाला नवल वाटत असेल. पण हे खरोखर घडलं आहे
देवास – जे काही करायचं ते जिवंत असताना करा, मेल्यावर काही मिळणार नाही अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. परंतु मध्य प्रदेशच्या देवास इथं ही म्हण उलटी सिद्ध झाली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने जे कांड केले आहे ते ऐकून सगळेच हैराण झाले. या व्यक्तीला बाजारात फिरताना पोलिसांनी पकडला त्यानंतर त्याने सर्व खुलासा केला. आरोपीनं जी कबुली दिली त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.
पैशाच्या लालसेपोटी या व्यक्तीला मरावं लागलं. हे वाचून आता तुम्हाला नवल वाटत असेल. पण हे खरोखर घडलं आहे. विमा रक्कमेशी निगडीत हे संपूर्ण प्रकरण आहे. १ कोटीचा विमा घेण्यासाठी या व्यक्तीने चक्क कागदोपत्री मृत्यू झाल्याचं सिद्ध केले. इतकचं विमा कंपनीनेही व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटी रक्कम दिली. त्यानंतर या पैशातून तो मौजमज्जेत जीवन जगत होता. परंतु कंपनीला संशय आला आणि त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, इटावात राहणाऱ्या अब्दुल हनीफनं SBI लाइफ इन्सुरन्समध्ये १ कोटी विमा काढला होता. याचे काही हफ्तेही तो भरत होता. परंतु त्यानंतर अब्दुलच्या डोक्यात भलताच विचार आला. त्याने मृत्यूची बनावट कागदपत्रे बनवली आणि १ कोटी विमा मिळावा यासाठी हालचाल केली.
डॉ. शाकीर मंसूरी यांच्याकडून अब्दुलनं बनावट कागदपत्रे तयार केली त्यानंतर अब्दुलच्या मुलाने नगरपालिकेकडून मृत्यू प्रमाणपत्र बनवून घेतले. प्रमाणपत्र आल्यानंतर अब्दुल हनीफच्या बायकोने SBI लाईफ इन्सुरन्स विम्यासाठी दावा केला. रक्कम अधिक होती आणि दोन हफ्ते फेडल्यानंतर मृत्यू झाल्यानं कंपनीला संशय आला. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
बाजारात फिरताना पोलिसांनी पकडलं
पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर त्यांची प्रकरणाची चौकशी केली. अब्दुल हनीफबद्दल तपास केला. तेव्हा अब्दुल बाजारात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. चौकशीवेळी अब्दुलनं डॉ. शाकीरचं नाव सांगितले त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोघांनाही कोर्टासमोर हजर करण्यात आले. अब्दुल हनीफची पत्नी रेहाना आणि मुलगा इक्बाल फरार आहे. तपास अधिकारी पवन यादव म्हणाले की, हनीफ ड्रायव्हर होता. इतक्या मोठ्या रक्कमेचा विमा बनवण्याची त्याची कुवत नव्हती परंतु प्रथम दर्शनी रक्कम हडपण्यासाठीच त्याने विमा केल्याचं दिसून येते. त्यानंतर मृत्यूचं षडयंत्र रचून त्याने विमा कंपनीकडून रक्कम लाटली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.