Crime News: पत्नी आणि मुलाचा खून केला, दोन वर्षे गुन्हा पचवला, अखेर बिअरच्या एका ग्लासमुळे भांडाफोड झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:28 IST2022-10-11T13:10:47+5:302022-10-11T14:28:32+5:30
Crime News: पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अशा एका आरोपीला अटक केली आहे जो पत्नी आणि मुलाचा खून करून दोन वर्षे बिनबोभाट वावरत होता.

Crime News: पत्नी आणि मुलाचा खून केला, दोन वर्षे गुन्हा पचवला, अखेर बिअरच्या एका ग्लासमुळे भांडाफोड झाला
भोपाळ - मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अशा एका आरोपीला अटक केली आहे जो पत्नी आणि मुलाचा खून करून दोन वर्षे बिनबोभाट वावरत होता. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी शिवराज उर्फ राजा चौहान ग्वाल्हेरच्या सागर ताल आणि काशीपुरा येथे बऱ्याच दिवसांपासून राहत होता. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
आरोपीने कितीही मोठा गुन्हा लपवण्याचा केला तरी तो अखेरीस काही तरी चूक करतोच, असे म्हटले जाते. या प्रकरणातही तेच घडले. आरोपी शिवराज चौहान याने तशीच चूक केली. त्याने बिअर बारमध्ये मित्रांसोबत बसल्यावर बढाई मारत पत्नी आणि मुलाची कशी हत्या केली, त्याचा घटनाक्रम सांगितला. तसेच दोन खून करून गुन्ह्यातून कसा निसटला याचंही वर्णन केलं. मात्र त्याचं हे बोलणं तिथे असलेल्या एका व्यक्तीने ऐकले.
त्याने याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी शिवराजला घेरले. तसेच त्याची आणि खबऱ्यामध्ये दारू पार्टी घडवून आणली. तेव्हा शिवराजने हत्येचं सारं गुपित उघड केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच दतिया पोलिसांना याची माहिती दिली. त्यातून हे भयानक हत्याकांड उघड झालं.
आरोपी शिवराज चौहान याने दोन लग्न केली होती. दरम्यान, त्याने २९ मे २०२० रोजी शिवराज याने पहिली पत्नी आस्था हिची जंगलात नेऊन गळा आवळून हत्या केली. तसेच ओळख पटू नये म्हणून रॉकेट टाकून मृतदेह जाळला. त्यानंतर या नराधमाने यावर्षी मार्च महिन्यात आठ वर्षांच्या मुलाचीही हत्या केली.