श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आफताब अमीन पूनावाला सध्या तुरुंगात आहे. आफताबच्या वकिलाने शुक्रवारी त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आफताबला तुरुंगात कडाक्याच्या थंडीचा त्रास होत असल्याचं अर्जात म्हटलं आहे. त्याच्याकडे पुरेसे कपडे नाहीत. अशा स्थितीत दैनंदिन वस्तूंबरोबरच उबदार कपडे घेण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे.
आफताबच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावालाच्या बँक खात्यात काही पैसे आहेत. त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड पोलीस अधिकाऱ्यांकडे आहेत. आफताबच्या वकिलाने युक्तिवाद केला की आरोपी 9 नोव्हेंबर 2022 पासून न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याच्याकडे हिवाळ्याच्या हंगामासाठी कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत.
न्यायालयाने आफताब अमीन पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आरोपींना 10 जानेवारीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीत थंडी पडली आहे. अशा स्थितीत आफताबने त्याच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची मागणी केली आहे जे सध्या पोलिसांकडे आहे. थंडीवर मात करण्यासाठी आफताबला काही आवश्यक कपडे खरेदी करायचे आहेत.
आफताबने श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे केले. या प्रकरणाबाबत देशभरात संताप व्यक्त होत आहे. आफताबची पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यात आली आहे. सध्या तो तिहार तुरुंगात बंद आहे. मारेकरी आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे केले. त्याने हे तुकडे दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवले आणि नंतर अनेक दिवस दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"