Image Credit : Aajtak)
राजा मानसिंग हे फारच लोकप्रिय आणि जनतेची सेवा करणारे राजा आणि नेते होते. स्वातंत्र्याआधी त्यांनी ब्रिटनमधून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आणि नंतर सेनेत सेकंड लेफ्टनंट कमांडर झाले. पण इंग्रजांशी त्यांचं फारसं पटलं नाही म्हणून त्यांनी नोकरी सोडली. १९५२ ते १९८४ पर्यंत ते बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले. पण त्यांच्यासोबत झालेला दगा त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला आपल्या जीपने धडक दिली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांचा खात्मा केला आणि याला झडप झाल्याचं दाखवण्यात आलं. आता ३५ वर्षानंतर सीबीआय कोर्टाने ती झडप खोटी मानली आहे आणि ११ पोलिसांना दोषी ठरवलं आहे.
Aajtak ने दिलेेल्या वृत्तानुसार, ही खरी कहाणी आहे भरतपूरच्या राजा मानसिंगची जे चार भावांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे होते. त्यांचा जन्म १९२१ मध्ये झाला होता. मोठे भाऊ बृजेंद्र सिंह हे महाराज होते. मानसिंग बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरींग करण्यासाठी ब्रिटनला पाठवलं होतं. डिग्री घेतल्यावर ते सेकंड लेफ्टनंट झाले. पण ही बाब त्यांनी मोठ्या भावाला सांगितली नाही. भरतपूरमध्ये लोक गाड्यांवर आणि महालावर दोन वेगवेगळे झेंडे लावत होते. एक देशाचा दुसरा त्यांच्या संस्थानाचा. इंग्रजाशी यावरून काही झालं आणि त्यांची नोकरी सोडली. स्वातंत्र्यानंतर ते राजकारणात आले.
काळ कॉंग्रेसचा होता. पण राजा मानसिंग कोणत्याही पक्षात जाणं मंजूर नव्हतं. कॉंग्रेसने त्यांच्यासोबत समझोता केला की, ते त्यांच्या विरोधात भलेही उमेदवार उभा करतील पण कोणताही मोठा नेता प्रचार करायला येणार नाही. १९५२ ते १९८४ पर्यंत ते बिनविरोध निवडून आहे. १९७७ मध्ये जनता लहर आणि १९८० मध्ये इंदिरा लहरीतही ते त्यांची सीट वाचवण्यात यशस्वी ठरले होते. पण काही लोकांना हे खटकत होतं की, अखेर भरतपूर संस्थान दोन झेंडे का लावतं. मानसिंग यांना कॉंग्रेस वॉक ओव्हर का देते.
१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. संपूर्ण देशात कॉंग्रेसबाबक सहानुभूती होती. १९८५ मध्ये राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होत होती. तेव्हा राजस्थानचे मुख्यमंत्री शिवचरण माथुर होते. असे सांगितले जाते की, त्यांनी डीगच्या सीटला प्रतिष्ठेची बनवलं आहे. त्यांनी रिटायर्ड आयएएस बिजेंद्र सिंह यांना डीगमधून कॉंग्रेस उमेदवार घोषित केलं आहे. आणि २० फेब्रुवारी १९८५ ला प्रचारासाठी ते डीगमध्ये पोहोचले. त्याआधी कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मानसिंग यांचे पोस्टर, बॅनर आणि संस्थानचे झेंडे फाडले होते.
राजा मानसिंग यांना ही बाब पसंत पडली नाही. शिवचरण माथुर सभेच्या ठिकाणी पोहोचण्याआधी राजा मानसिंग तिथे पोहोचले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेजची तोडफोड केली. त्यानंतर ते जोंगा जीपने हेलिपॅडकडे गेले. तिथे मुख्यमंत्री माथुर याचं हेलिकॉप्टर उभं होतं. माथुर सभा स्थळाकडे निघाले होते आणि राजा मानसिंग हे हेलिपॅडकडे. राजांनी जीपने हेलिकॉप्टरला टक्कर मारली. माथुर यांना रस्त्यामार्गे जयपूरला जावं लागलं होतं. गावात फारच तणावाचं वातावरण झालं होतं. गावात कर्फ्यू लावण्यात आला. राजा विरोधात केस दाखल करण्यात आली.
असे सांगितले जाते की, 21 फेब्रुवारीला राजा मानसिंग आपल्या समर्थकांसह आपल्या जीपमधून निघाले होते. त्यांच्या समर्थकांनी त्यांना जाण्यात मनाई केली होती. बाहेर कर्फ्यू होता. पण ते ऐकले नाही. राजघराण्याचं मत होतं की, मानसिंग हे समर्पण करण्यासाठी जात होते. तेव्हाच डीग मंडीजवळ डेप्युटी एसपी कान सिंह भाटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानसिंग यांना वेढा दिला आणि त्यांच्यावर जोरदार फायरिंग केली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले हरी सिंग आणि सुमेर सिंग यांचीही हत्या करण्यात आली. पोलीस या घटनेला चममक दाखवण्यात बिझी होती. राजा मानसिंग यांचे जावई विजय सिंग यांनी कान सिंग भाटी आणि १८ जणांविरोधात केस दाखल केली.
या घटनेमुळे भरपूरमध्ये जाळपोळ झाली होती. याचा परिणाम मथुरा, आग्रा आणि संपूर्ण राजस्थानमध्ये बघायला मिळाला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं होतं की, एका सिटिंग एमएलएचा आणि राजघराण्यातील व्यक्तीचा भर दिवसा एन्काउंटर झाला होता. या हत्येचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथुर यांच्यावर लागला होता. माथुर यांना राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राजा मानसिंग यांची मुलगी कृष्णेंद्र कौर दीपा निवडून आली होती. प्रकरणारी चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. दरम्यान १९९० मध्ये दीपा भरतपूरमधून भाजपाची खासदार म्हणून निवडून आली. पुढे ही केस लढणारे वकील नारायण सिंह विप्लवी म्हणाले की, न्याय मिळवण्यासाठी वर्षे लागली. पोलिसांनी हत्याच केली होती आमच्याकडून ६१ साक्षिदार सादर केले गेले आणि पोलिसांकडून १६. पण त्यांची चूक केली होती म्हणून ते हरणार होतेच. आता तब्बल ३५ वर्षांनंतर या केसचा निकाल आला. दरम्यान १७०० तारखा झाल्या, अनेक जज बदलले. यात ११ पोलिसांना दोषी ठरवण्यात आलं.