नवी दिल्ली – ऑनलाइन रिलेशनशिपबद्दल अनेकदा फसवणूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या प्रेमासाठी काहीजण सातासमुद्रापार जाण्यासही तयार असतात. अशाच एका ऑनलाईन सुरु असलेल्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तब्बल १० वर्ष हे प्रेम प्रकरण सुरु होतं. मात्र जेव्हा सत्य उघडकीस आलं तेव्हा पीडित युवतीला धक्काच बसला.
पीडित युवती ऑनलाईन रिलेशनशिप असलेल्या समोरच्या व्यक्तीला बॉयफ्रेंड मानत होती. पण पीडित युवती ज्या व्यक्तीसोबत डेट करत होती ती दुसरं तिसरं कुणी नसून तिचीच बहीण असल्याचं उघड झालं. ज्याला ती पुरुष मानत होती ती तिची बहीण होती. जेव्हा पीडित युवतीला कळालं तिची फसवणूक होत आहे तेव्हा तिने मदतीसाठी कोर्टाकडे विनवणी केली. १० वर्षानंतर तिच्या प्रेमाच्या नात्यात फसवणूक होत असल्याचं तिच्या लक्षात आलं. ऑनलाइन नात्यात झालेल्या फसवणुकीनंतर पीडित युवती चिंतेत गेली.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जी महिला या ऑनलाईन डेटिंगची शिकार झाली. ती ४२ वर्षाची आहे. या पीडित महिलेने पॉडकास्ट शो Sweet Bobby मध्ये तिचे अनुभव कथन केले. युवती लंडनमध्ये रेडिओ डिजे म्हणून काम करते. या प्रकारच्या कृत्याला गुन्हा घोषित केला पाहिजे असं तिने मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित युवती २००९ पासून फेसबुकच्या माध्यमातून बॉबी नावाच्या व्यक्तीसोबत बोलत होती. बॉबीने बनावट फोटो आयडी बनवला होता. संडे टाइम्सशी युवतीने संवाद साधला त्यात पीडित युवती म्हणाली की, ज्या बॉबीसोबत मी बोलत होते. ती वास्तविक माझी बहीण सिमरन होती. इतकचं नाही तर १० वर्षाच्या काळात सिमरननं कधीही हे जाणवून दिलं नाही. ऑनलाइन नात्यात कायम तिने उत्साहित केले असं पीडित युवतीने सांगितले.
इतकचं नाही तर चौकशीत उघड झालं की, सिमरनने एकूण ५० बनावट आयडी प्रोफाईल बनवलं आहे. ज्यात ती लोकांशी संवाद साधते. १० वर्षाच्या या काळात कधीही पीडित युवती आणि सिमरन यांची भेट झाली नाही. सिमरन उर्फ बॉबी म्हणाली की, ती ऑस्ट्रेलियात राहते. जेव्हा पीडित युवतीला संशय आला तेव्हा तिने खासगी डिटेक्टिव्हची मदत घेतली. ज्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या नात्यामुळे माझ्या आयुष्यावर परिणाम झाला. माझं आरोग्य, कुटुंब, सोशल लाइफ, रेडियोचं काम, करिअर सर्वकाही खराब झाले. ब्रिटनमध्ये अशा कृत्यावर कोणताही कायदा नाही. ज्यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला मानसिक छळासाठी जेलमध्ये जावं लागू शकतं. त्यामुळे पीडितेने हा गुन्हा घोषित करावा अशी मागणी केली आहे.