मुंबई - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आज जवळजवळ साडेआठ तास ईडीने ही चौकशी केली असून राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि स्नेही सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होते. ईडीच्या तीन अधिकाऱ्यांसमोर राज ठाकरे यांची कसून चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तसेच याआधी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व त्यांचे तत्कालिन भागीदार राजन शिरोडकर यांच्यामागे लागलेला ईडीच्या चौकशीचा ससेमिरा अद्याप संपलेला नाही. बुधवारी त्यांच्याकडून पुन्हा आठ तास कसून विचारणा केलेली असून सोमवारी (दि.२६) त्यांना पुन्हा कार्यालयात पाचारण केलेले आहे.कोहिनूर स्केअर टॉवर प्रकल्पाच्या प्रारंभापासून करण्यात आलेला व्यवहार आणि त्यासंबंधीच्या दस्ताऐवजाबाबत दोघांकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. त्यासाठीजोशी व शिरोडकर यांना एकत्र तसेच स्वतंत्र बसून विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दादर पश्चिमेकडील शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोहिनूर स्केअर टॉवरच्या २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष व कोहिनूर समूहाचे तत्कालिन भागीदार राज ठाकरे यांच्यासह जोशी व शिरोडकर यांची चौकशी सुरु केली आहे. सोमवारी व मंगळवारी जोशी यांची सलग आठ तास चौकशी केली होती. तर शिरोडकर यांच्याकडे काल पाच तास चौकशी करण्यात आली. दोघांना आजही कार्यालयात बोलाविल्याने ते अकराच्या सुमारास हजर झाले. कोहिनूर टॉवरच्या व्यवहरासंबंधीची कागदपत्रे त्यांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. दोघांची एकत्र तसेच स्वतंत्रपणे विचारणा करण्यात आली. सुमारे सातच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्याकडील चौकशी अपूर्ण राहिल्याने सोमवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा बोलाविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी जोशी यांच्याकडे आतापर्यंत जवळपास ३६ तास तर शिरोडकर यांनी १३ तास ईडीच्या कार्यालयात हजेरी लावले आहे.
कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचू पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज काही मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि बहीण, सून यांच्यासोबत १०.३० वाजताच्या सुमारास दादर येथील कृष्णकुंजवरुन ईडीच्या कार्यलयाच्या दिशेने रवाना झाले होते. दादरच्या कृष्णकुंज या निवासस्थानावरुन राज हे सहकुटुंब ईडीच्या कार्यलयात साडे अकराच्या सुमारास दाखल झाले होते आणि आता सायंकाळी 8.15 वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयाबाहेर आले.
Raj Thackeray ED Notice Live : राज ठाकरे काही क्षणातच ईडीच्या कार्यालयाबाहेर येणार