कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला अत्याच आणि हत्येप्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली आहे. कोलकात्यातील प्रेसीडेंसी कारागृहात सीबीआयसह पोहोचलेल्या सीएफएसएल टीमने रविवारी (25 ऑगस्ट) आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट केली. साधारणपणे साडेतीनतास चाललेल्या या टेस्टदरम्यान संजय रॉयला अनेक प्रश्न विचारण्यात आले. प्रकरणातील सत्य समोर यावे, या उद्देशाने संजय रॉयसह आणखी दोघांची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली.
पॉलीग्राफ टेस्टदरम्यान संजय रॉयला विचारण्यात आले की, कोलकाता केसमध्ये 8 आणि 9 ऑगस्टच्या रात्रीचे संपूर्ण सत्य काय आहे? महिला डॉक्टरवरील बलात्कार-मर्डर प्रकरणात आरोपी संजय रॉयसह आणखी कुणी सहभागी होतं का? मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ट दरम्यान सीबीआयने विचारले की, तो हत्येच्या इराद्याने रुग्णालयात आला होता का? रुग्णालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराचे धागे-दोरे रेप-मर्डर प्रकरणाशी जोडले गेले आहेत का? त्याने या प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरं दिली नाहीत, मात्र चुकीची उत्तरं नक्कीच दिली.
पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी संजयने काय सांगितले? - सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, संजय रॉयने पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान दावा केला आहे की, तो मद्यधुंद होता (त्याने बिअर प्यालेली होती) आणि त्याने चुकून पीडितेला रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये बघितले. आरोपीने म्हटे आहे की त्याचे हेल्मेट चुकून दरवाजावर आदळले आणि ओपन झाले. तसेच आपम जेव्ह पहिल्यांदा पीडितेला बघितले तेव्हा ती मरण पावलेली होती. यामुळे आपण घाबरलो आणि तेथून पळ काढला, असा दावाही त्याने केला. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, 8 आणि 9 ऑगस्टच्या घटनेसंदर्भात देण्यात आलेली उत्तर खोटी आणि विश्वास ठेवण्यासारखी नाहीत.
जर निर्दोष होता तर तेथून पळ का काढला? पोलिसांना माहिती का नाही दिली? असा प्रश्नही आरोपीला विचारण्यात आला. याशिवाय, त्याच्या विरोधात अत्याचार आणि हत्येसंदर्भात एवढे पुरावे कसे मिळाले आहेत? असा प्रश्नही त्याला करण्यात आला. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे दिली नाहीत. तो म्हणाला की भीतीपोटी पळून गेला. मात्र, सीबीआयचे अधिकारी आरोपीच्या उत्तरावर संतुष्ट दिसून आले नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीची नार्को टेस्टदेखील केली जाऊ शकते.