- नितिन पंडीत
भिवंडी - एकाच रात्रीत तब्बल दहा घरफोड्या करून पसार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. रवी उर्फ गानू तानाजी धनगर ( वय १९ रा . आंबिवली कल्याण ) व राज विजय राजापूरे ( वय २१ , रा . इंदोर मध्यप्रदेश ) अशी घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या दोघा चोरट्यांनी नावे आहेत . या दोघा चोरट्यांनी कोनगाव गावात इकच रात्रीत तब्बल १० दुकानांचे शटर उचकटून दुकानातील सामान तसेच रोख रकमेची चोरी केली होती . या चोरी प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात १५ डिसेंबर २०२१ रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारावर कोनगाव पोलिसांनी रवी व त्याचा साथीदार राज या दोघांचा कसून तपास करून या दोघांना अटक केली आहे . या आरोपींना न्यायालयात हजर केले असता १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहहती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी शनिवारी दिली आहे.