सोमनाथ खताळ, बीड: कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दराेडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. टोळीतील पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि तीन लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी केज तालुक्यात करण्यात आली.
विकास सुभाष सावंत (वय २७ रा. सावंतवाडी, ता. केज, अजय अशोक तांदळे (वय २३ रा.कोरेगांव, ता.केज), सोमनाथ राजाभाऊ चाळक (वय २२ वर्ष, रा.लव्हुरी, ता. केज), बालाजी राम लांब (वय १९ रा. कोरेगांव, ता. केज) व रविंद्र उर्फ आण्णा दत्ता सुर्यवंशी (वय २६ रा.पिसेगांव, ता.केज) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. मागील १५ दिवसांत या काेयता गँगने केज, युसूफवडगाव व वडवणी तालुक्यात धुमाकूळ घातला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत या टोळीचा पर्दाफाश केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके, सहायक अधीक्षक कमलेश मीना, धिरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि ज्ञानेश्वर राडकर, सुशांत सुतळे, सफौ तुळशीराम जगताप, प्रल्हाद चव्हाण, रामदास तांदळे, मारुती कांगळे, राहूल शिंदे, बाळकृष्ण जायभाये, जफर पठाण, देवीदास जमदाडे, विकी सुरवसे, गणेश हांगे, संजय जायभाये, अतल हराळे आदींनी केली.