तेलंगणाच्या हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुज्याऱ्याने आपल्या भाचीची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर, हा पुजारी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने एक महिला हरवल्याची तक्रार तेथे दिली. यानंतर संबंधित महिलेचा शोध सुरू होतो. मात्र, शोध जस-जसा पुढे सरकला, तस-तसा पुजारीच संशयाच्या जाळ्यात अडकत गेला. पण, यानंतर जो खुलासा झाला, तो जाणून आपल्यालाही धक्का बसले.
यासंदर्भात, संबंधित पुजारी 5 जून 2023 रोजी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट पोलीस ठाण्यात जाऊन आपली भाची कुरुगांती अप्सरा हरवली असल्यासंदर्भात तक्रार देतो. यावेळी तो त्याचे नाव अयागरी साई कृष्णा असल्याचे सांगतो. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर, आपण कुरुगांती अप्सराला दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच 3 जूनच्या रात्री शम्साबाद भागात ड्रॉप केले होते. कारण तिला तेथून भद्रांचलम येथे आपल्या मित्रांकडे जायचे होते. मात्र यानंतर ती ना भद्राचलम येते पोहोचली ना हेदराबादला आपल्या घरी आली. आता तिचा मोबाईलही स्विच्ड ऑफ येत आहे. यासंदर्भात आपल्याला तक्रार दाखल करायची आहे, असे पुजारी पोलिसांना सांगतो.
पुजाऱ्याचीच चौकशी - अयागरी साई कृष्णा (36) हा हैदराबादमधील सरूरनगर भागातील पुजारी आहे. त्यानेच त्याच्या भाचीला हरवण्यापूर्वी शेवटचे पाहिले असल्याने पोलीस त्याचीच चौकशी करायचे ठरवतात आणि त्याचीच चौकशी करतात.
पुजारीच ठरला भाचीचा खुनी -चौकशी दरम्यान पोलिसांना पुजाऱ्यावरच संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावर आपणच भाची कुरुगांती अप्सराची हत्या केली आणि ती आता या जगात नाही, अशी कबुली त्याने दिली. यानंतर, त्याने तिची हत्या का केली आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली.
भाचीसोबत पुजाऱ्याचे अनैतिक संबंध - खरे तर, विवाहित आणि दोन मुलांचा बाप असूनही साई कृष्णाचे आपल्या भाचीसोबत अनैतिक संबंध होते. आता त्याची भाची अप्सरा त्यांच्या या नात्याला नाव देण्याचा आग्रह करत होती. साई कष्णाने आपल्या पत्नीला आणि मुलांना सोडून देऊन तिच्यासोबत लग्न करावे, अशी तिची इच्छा होती. मात्र, साई कृष्णासाठी हे अशक्य होतो. या विषयावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाले. या भांडणाला कंटाळून त्याने भाचीची हत्या करण्यचे ठवरले.
दगडाने ठेचून केली हत्या - पुजाऱ्याने भाचीला तीन जूनच्या रात्री फिरायला नेण्याच्या बहाण्याने शम्साबादमध्येच एका निर्जनस्थळी नेले आणि तेथे तिची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर, त्याने तिचा मृतदेह डिक्कीत ठेऊन विल्हेवाट लावण्यासाठी नेला आणि आपल्या मंदिरामागे एका मेनहोलमध्ये टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यावर दोन ट्रक मातीही टाकली होती.