शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Published: July 07, 2024 10:25 PM

सात रस्ता परिसरातील प्रकार, शासन देणार प्रति अर्जासाठी ५० हजार रुपये

विलास जळकोटकर, सोलापूर: शासनाकडून राज्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही योजना राबवत आहे. या योजनेसाठी लाभार्थी महिलांकडून कोणतीही रक्कम न आकारता फार्म भरुन देणे अपेक्षित आहे मात्र, १०० ते २०० रुपये आकारल्याने सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालक-मालकांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हे नोंदले आहेत. या प्रकरणी मंडल अधिकारी सारिका कल्याण वाव्हळ (नोकरी, उत्तर तहसील कार्यालय,सोलापूर) यांनी फिर्याद दिली. प्रगती नेट कॅफे व योगेश्वर नेट कॅफेचे चालक-मालक अशी गुन्हा नोंदलेल्या कॅफेची नावे आहेत. सदर बझार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ३१८ (२), ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

फिर्यादीदीत म्हटले आहे की, राज्य शासन मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यात सर्वत्र राबवत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना १५०० रुपये शासन देणार आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरत असताना महा-ई-सेवा केंद्र अथवा नेट कॅफे यांनी कोणतेही शुल्क न आकारता मोफत अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याबाबत शासन निर्देश दिले आहेत. शासन संबंधित सेवा केंद्राला प्रति अर्ज पन्नास रुपये शुल्क देणार आहे.असे असताना सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालकांनी लाभार्थी महिलाकडून शंभर व दोनशे रुपये शुल्क आकारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर बझार पोलिसांनी संबंधित नेट कॅफे चालकाविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला असून, तपास फौजदार शिंदे करीत आहेत.----जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशजिल्ह्यातील प्रत्येक महा-ई-सेवा केंद्र व नेट कॅफेवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोणीही या योजनेचे अर्ज भरण्यास संबंधित महिला लाभार्थ्याकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.----खबर मिळाली अन् गुन्हे दाखलसात रस्ता परिसरातील नमूद दोन्ही कॅफेमध्ये ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून शंभर ते तीनशे रुपये आकारले जात असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाकडून सोलापूर उत्तरचे प्रांत अधिकारी सदाशिव पडणे यांना मिळाली. प्रांताधिकारी सदाशिव पडदूणे यांनी उत्तरच्या तहसिलदाराना यांना सूचना केल्याने शहानिशा करुन गुन्हे नोंदले गेले.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSolapurसोलापूर