मुस्काटात मारून जमिनीवर आपटलं, केस ओढून खेचत खेचत नेले, आईला वाचवण्यासाठी लेक सरसावली पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:42 PM2021-05-19T18:42:33+5:302021-05-19T18:43:04+5:30

Lady Police Constable Beats to Women : एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्या मुलीला शिवीगाळ केली आणि ढकलले.

Lady constable and woman creepy fight lady constable beat up a mother and daughter on road in sagar for not wearing mask | मुस्काटात मारून जमिनीवर आपटलं, केस ओढून खेचत खेचत नेले, आईला वाचवण्यासाठी लेक सरसावली पण... 

मुस्काटात मारून जमिनीवर आपटलं, केस ओढून खेचत खेचत नेले, आईला वाचवण्यासाठी लेक सरसावली पण... 

googlenewsNext
ठळक मुद्दे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. ही महिला सागर जिल्ह्यातील रहिरहाली ब्लॉकमधील खेड्यातून काही कामानिमित्त राहळी येथे पोहोचली होती.

सागर - मास्क घातला नाही म्हणून त्याची इतकी भयानक शिक्षा दिली जेणेकरुन मानवतेला लाज वाटेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये लेडी कॉन्स्टेबलने एका महिलेबरोबर निर्दयतेची मर्यादा ओलांडली आहे. मास्क न घातल्याने पोलिसांच्या जीपमधून जबरदस्तीने तिलाताब्यात घेतले. महिलेने विरोध दर्शविला तेव्हा लेडी कॉन्स्टेबलने तिला मारहाण करण्यास सुरवात केली. एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्या मुलीला शिवीगाळ केली आणि ढकलले.


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. ही महिला सागर जिल्ह्यातील रहिरहाली ब्लॉकमधील खेड्यातून काही कामानिमित्त राहळी येथे पोहोचली होती. महिलेने मास्क घातला नव्हता आणि मुलीच्या तोंडाला स्कार्फ बांधलेला होता. दरम्यान, तपासणी दरम्यान पोलिसांनी गांधी चौक जवळ त्यांना पकडले. मास्क न घातल्याबद्दल महिलेने पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलने महिलेला पोलिसांच्या जीपमध्ये बसविले.

महिलेची मुलगी थांबण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिला तेथून ढकलले. त्यानंतर महिला पोलिसांनी जीपमध्ये बसण्यास नकार दिला. महिला कॉन्स्टेबलने संतापाच्या भरात तिला मारहाण करण्यास सुरवात केली. महिला पोलीस कॉन्स्टेबलने महिलेवर जोरदार कानशिलात मारली. यावेळी, महिलेची मुलगी आईला वाचविण्यासाठी जवळ गेली. त्यावेळी एका पोलिसाने तिला शिवीगाळ केली. 

महिला पोलीस कॉन्स्टेबलने रस्त्यावर फटकारले आणि महिलेला रस्त्यावर उतरवले. त्यानंतर, तिने तिचे केस पकडले आणि खेचून फरफटत ओढू लागली. यावेळी पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा चहुबाजूंनी तिला घेरून ठेवले. अमानुषतेचा हा संपूर्ण व्हिडिओ कुणीतरी बनवला आहे, तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मास्क न घालण्याची शिक्षा इतकी भयानक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना कर्फ्यू मोडणार्‍या लोकांवर प्राणघातक हल्ला करु नका असा इशाराही मध्य प्रदेशात कोर्टाने पोलिसांना दिला आहे. परंतु, दोषी पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलिसांनी सांगितले की, महिलेने लेडी कॉन्स्टेबलला मारहाण केली. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, केवळ महिला कॉन्स्टेबलच या महिलेवर अत्याचार करत आहे.

 

Web Title: Lady constable and woman creepy fight lady constable beat up a mother and daughter on road in sagar for not wearing mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.