शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

गडहिंग्लजनजीक अपघातात डॉक्टर तरुणी जागीच ठार; कंटेनरची दुचाकीला समोरून धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 9:10 PM

 धडकेत तिच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

गडहिंग्लज- चंदगड  मार्गावरील भडगावनजीक मालवाहू कंटेनरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉक्टर तरुणी जागीच ठार झाली.उमा मार्तंड जरळी ( वय २६,मूळगाव मुत्नाळ ता.गडहिंग्लज सध्या रा.संकेश्वर)असे मृत तरूणीचे नाव आहे.याप्रकरणी कंटेनर चालक प्रकाश नाना पाटील (रा.वडजी, भडगाव,जि.जळगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.रविवारी(२६) सकाळी  साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

     पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, डॉ. उमा ही गेल्या काही महिन्यांपासून महागाव येथील संत गजानन महाराज ग्रामीण रुग्णालयात नोकरीला होती.    रविवारी सकाळी ती आपल्या दुचाकीवरून (एम.एच.०९-एफ. एन.२३९४) संकेश्वरहुन महागावकडे कामावर जात होती.दरम्यान, भडगावनजीक शंकर हिरेकुडे यांच्या शेतानजीकच्या  वळणावर चंदगडकडून भरधाव येणाऱ्या मालवाहू कंटेनरने ( एम.पी.०९-जी.जी.७५३८)तिच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

 धडकेत तिच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.तिच्या पश्चात आई - वडील,भाऊ असा परिवार आहे.      भारतीय किसान मोर्चाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष मार्तंड जरळी व मुत्नाळच्या माजी सरपंच माधवी जरळी यांची ती मुलगी होय.भीमा जरळी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

मुत्नाळ गावावर शोककळा!उमा ही अत्यंत हुशार व मनमिळाऊ होती. गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयातून तिने बी.एच.एम.एस.पदवी घेतली होती. कोरोना कालावधीत तिने मुंबई येथील दवाखान्यात वर्षभर नोकरी केली.त्यानंतर अलिकडेच ती महागाव येथील दवाखान्यात रूजू झाली होती.तिच्या अकाली मृत्यूने जरळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून मुत्नाळ गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात