अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे दिला जणारा ‘कोविड वुमेन वारिअर्स द रिअल हीरो’ हा पुरस्कार जाहीर झाला.
देशात ‘कोरोना विषाणूचा’ प्रादुर्भाव वाढला तेव्हा सर्वाधिक झळ मालेगावातही पोहचली होती. नाशिक जिल्ह्याच्या तत्कालीन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी लॉकडाऊनच्या काळात मालेगावात निर्भयपणे कार्य करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या उत्कृष्ट कार्याची प्रथम नोंद राज्य शासनाने घेतली. त्यानंतर राज्य शासनाकडून केंद्र शासनाने माहिती घेऊन आरती सिंह यांच्या धाडसी कार्याची पावती म्हणून त्यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने ‘कोविड वुमेन वारिअर्स द रिअल हीरो’हा पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार त्यांना ३१ जानेवारी २०२१ रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.