बंगळुरू - कर्नाटकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये मोठे घबाड तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. नऊ अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दागदागिने, सोन्याची भांडीकुंडी आणि महागडी घड्याळे हस्तगत करण्यात आली. (Lakhs of jewelery, gold utensils and expensive watches, 9 officers' houses raided)
कर्नाटक अँटी करप्शन ब्युरोने राज्यातील विविध भागांत छापेमारी करण्यात आली. सुमारे ५२ अधिकारी आणि १७२ कर्मचाऱ्यांच्या एका पथकाने ११ जिल्ह्यांतील २८ ठिकाणांवरून नऊ अधिकाऱ्यांविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी हे छापे टाकण्यात आले. कर्नाटक भ्रष्टाचार विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार या छापेमारीदरम्यान, म्हैसूरमधील सुपरिटेंडेंट इंजिनियर के.एम. मुनी गोपाल राजू यांच्या घरात छापेमारी करण्यात आली. त्यांच्या घरातून दागदागिने, महागडी घड्याळे आणि सोन्याचे दागिने सापडले.