अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. करुणा मुंडेंविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे तक्रारदाराविरोधात करुणा शर्मांच्यावतीनं आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात नवा पक्ष काढण्यासाठी फिर्यादी भारत भोसले यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप करुणा मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे. २२ लाख ४५ हजार रोख आणि १२ लाखांचे सोने घेतल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. उसनवारी म्हणून दिलेली रक्कम आणि सोने परत दिले नाही म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
करुणा मुंडे यांची यांनीही संगमनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमधील तिघांनी त्यांना एका कन्स्ट्रक्शन कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल, असे सांगत त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. याचा कुठलाही परतावा न दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर करुणा मुंडे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.