मुंबई - बनावट चावीच्या आधारे ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात चोरी केल्याची घटना मंगळवारी नागपाडा परिसरात घडली. यात, एकूण साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.अंधेरीतील रहिवासी असलेले पुरुषोत्तम कुंदर (३३) यांच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत. लॅमिंग्टन रोड येथे त्यांच्या ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय आहे. यात ते व्यवस्थापक आहेत. त्यांच्या कार्यालयात एकूण १२ कर्मचारी आहेत. त्यांच्या कंपनीद्वारे तरुण - तरुणींना परदेशात खासगी नोकरीसाठी नेमणूक करण्याचे काम केले जाते.संबंधितांचे तिकीट, व्हिसा आणि अन्य कामांसाठी लागणारे पैसे कार्यालयातच जमा असतात. १० आॅगस्ट रोजी कार्यालय नेहमीप्रमाणे बंद करून कर्मचारी निघून गेले. त्यानंतर दोन दिवस कार्यालयाला सुट्टी असल्याने ते बंदच होते. १३ तारखेला कार्यालय उघडले. कामकाज सुरू असताना लॉकरमधील ३ लाख ६७ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब कार्यालयात समजताच खळबळ उडाली.
बनावट चावीच्याआधारे ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयावर लाखोंचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 1:17 PM
ही बाब कार्यालयात समजताच खळबळ उडाली.
ठळक मुद्देकामकाज सुरू असताना लॉकरमधील ३ लाख ६७ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.