एमपीएमएलए कोर्टाने (PMLA Court) आज लालू प्रसाद यादव यांचे मेहुणे आणि माजी आमदार साधू यादव यांना तीन वर्षांचा तुरुंगवास तर १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. परिवहन विभागाच्या कार्यालयात घुसून शासकीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त तुरुंग (Jail) कारावास भोगावा लागणार आहे.
भादंवि कलम ३५३मध्ये दोन वर्षे तुरुंगवास आणि ५ हजार रुपये दंड, कलम ४४८ अन्वये एक वर्ष तुरुंगवास आणि १ हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्वये २ वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. माजी आमदार तात्पुरत्या जामिनासाठी याचिका दाखल करणार असल्याचे साधू यादव यांच्या वकिलांनी सांगितले आहे. लालू प्रसाद यादव हे बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर बहीण-भावजयांचे साधूसोबतचे संबंध काही कारणाने बिघडले होते. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांची राजवट असताना राबडी देवी यांचे भाऊ आणि लालूंचे मेहुणे अनिरुद्ध यादव ऊर्फ साधू यादव यांच्याकडे मोठे पद होते. प्रशासनात साधू हे लालू आणि राबडी यांचे उजवे हात मानले जात होते.
लग्नात परपुरुषाशी डान्स करणं महिलेच्या जीवावर बेतलं, पतीने केली पत्नीला बेदम मारहाण
लालूंनी साधू यांना विधान परिषदेचे सदस्य आणि आमदार (MLA) केले. २००४च्या लोकसभा निवडणुकीत साधू यादव हे गोपालगंज मतदारसंघातून आरजेडीचे खासदार म्हणून देखील निवडून आले. लालूंनी त्यांचे दुसरे मेव्हणे सुभाष यादव यांनाही राजकारणात आणले आणि पदोन्नती दिली. लालूंच्या दोन्ही वर्षांत साधू आणि सुभाषची जोडी बिहारमध्ये सक्रिय होती.