शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नववधुचे कान कापून दागिने लंपास, चोरट्यांचा मध्यरात्री दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 5:03 PM

चोरटे अंदाजे ३० ते ३५ वयोगटाचे असल्याचा अंदाज असून, त्यांनी अंगात जर्किन, हातात ग्लोव्ह्ज तसेच लोखंडी सळी, हातात स्टीलचे कडे, डोक्याला रुमाल बांधलेल्या अवस्थेत होते.

ठळक मुद्देपोलीस सूत्रानुसार मंगळवेढा शहरालगतच्या धर्मगाव रोडवर फिर्यादी मंदाकिनी अंबादास सावंजी या त्यांच्या बंगल्यात राहतात. शुक्रवारच्या पहाटे साडेतीन वाजता अज्ञात सहा दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला.

सोलापूर - जिल्ह्यातील मंगळवेढा शहर परिसरात असलेल्या एका बंगल्यात दरोडेखोरांनी मध्यरात्री 3.30 वाजता दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गळ्याला चाकून लावून घरातील महिलांच्या अंगावरील दागिने रोख रक्कम असा 4.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी, नववधुसह महिलांच्या कानातील दागिने काढताना त्रास होऊ लागल्याने चक्क कात्रीने कानाल कट मारुन दागिने काढण्याचा निर्दयी प्रकार चोरट्यांनी केला. याप्रकरणी, अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रानुसार मंगळवेढा शहरालगतच्या धर्मगाव रोडवर फिर्यादी मंदाकिनी अंबादास सावंजी या त्यांच्या बंगल्यात राहतात. शुक्रवारच्या पहाटे साडेतीन वाजता अज्ञात सहा दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोने, घरातील पैसे काढून द्या अन्यथा तुम्हाला खल्लास करू, असे म्हणत नववधूच्या अंगावरील व फिर्यादीच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. या झटापटीत फिर्यादीच्या अंगठ्याजवळच्या बोटाला जखम झाली.

चोरटे अंदाजे ३० ते ३५ वयोगटाचे असल्याचा अंदाज असून, त्यांनी अंगात जर्किन, हातात ग्लोव्ह्ज तसेच लोखंडी सळी, हातात स्टीलचे कडे, डोक्याला रुमाल बांधलेल्या अवस्थेत होते. चोरट्यानी महिलांच्या कानातील दागिने निघत नसल्याने दरोडेखोरांनी कात्रीच्या साह्याने कट मारून काढून घेतले.

या घटनेत सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व कपाटातील रोख रक्कम असा एकूण साडेचार लाखाचा ऐवज लुटून नेला. लग्नात आलेल्या साड्या व कपडे या वस्तूही घेऊन गेले. दरोडेखोरांनी जाताना कुटुंबीयांना एका खोलीत कोंडून बाहेरून कडी लावून गेले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधत सुटका करून घेतली. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधिकारी हिम्मतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर श्वान पथक आले. ते श्वान घटनास्थळापासून पिकातून दामाजी कारखाना रस्त्यावरील सूत मिलपर्यंत गेले. याबाबत अज्ञात सहा चोरट्यांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे करीत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या घराजवळच दरोडा

दरोडा पडलेल्या ठिकाणापासून पोलीस निरीक्षक गुंजवटे हे हाकेच्या अंतरावर राहतात. हा दरोडा ते राहत असलेल्या पाठीमागील बाजूस पडला तर, काही दिवसापूर्वी हजारे यांच्या बंगल्यावरील पडलेला दरोडा गुंजवटे राहत असलेल्या पुढील बाजूस पडला होता. दोन्ही दरोडे या पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्याशेजारी घडल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.

पोलीस ठाण्यासमोर महिलेचा आक्रोश

तपासासाठी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची एक नातेवाईक महिला पोलीस स्टेशन आवारात सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमोर आमचे नातेवाईक दोषी नसताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा आक्रोश केला. येथील जबाबदार स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून मरणार असल्याचा हंबरडा फोडून ओरडत होती. पोलिसांनी त्या महिलेचे अक्राळविक्राळ रूप पाहून पंढरपूरहून महिला पोलिसांचा बंदोबस्त मागविला.

चोऱ्यांचे सत्र सुरू

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात तीन दरोडे व अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे सत्र गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. १५ दिवसापूर्वी पडोळकरवाडी येथे एका वृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटले होते. त्या दरोड्याचा तपास अद्यापही लागला नाही. पुन्हा शहरात दरोडा पडल्याने दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हान दिल्याने नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. याबाबत राज्याचे पोलीस महासंचालकांनी त्वरित लक्ष घालून सक्षम अधिकारी नेमून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरPoliceपोलिस