बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 10:16 PM2020-07-25T22:16:18+5:302020-07-25T22:16:58+5:30
या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील 150 ते 200 दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे.
बंगळुरू - दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, केरळ आणि कर्नाटकात ISIS च्या दहशतवाद्यांची संख्या सर्वाधिक असू शकते आणि भारतीय उपखंडातील अल कायदाच्या दहशतवादी संघटना या भागात असल्याचेही त्यांनी नमूद करत हल्ला घडवून आणण्यासाठी कट रचत आहेत. या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील 150 ते 200 दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे.
आयएसआयएस, अल कायदा व त्यासंबंधित व्यक्ती व संस्था यांच्याशी संबंधित विश्लेषक सहाय्य आणि प्रतिबंध देखरेख पथकाच्या 26 व्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतीय उपखंडातील अल-कायदा (एक्यूआयएस) अफगाणिस्तानच्या निमरूज, हेलमंद आणि कंधार प्रांतातील तालिबानअंतर्गत कार्यरत आहे. त्यात म्हटले आहे की, 'अहवालानुसार या संघटनेचे बांग्लादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमधील 150 ते 200 सदस्य आहेत. मारला गेलेला असीम उमरची जागा घेणारा ओसामा महमूद हा एक्यूआयएसचा सध्याचा मुख्य सूत्रधार आहे. असे अहवाल आहेत की, एक्यूआयएस आपल्या माजी आकाच्या (गुरु) मृत्यूचा बदला घेण्यासाठी या भागात सूड उगवण्याचा कट रचत आहे.
या अहवालानुसार '10 मे, 2019 रोजी घोषित करण्यात आलेल्या आयएसआयएलच्या भारतीय सहयोगी (हिंद विलायह) मध्ये 180 ते 200 सभासद आहेत, अशी माहिती एका सदस्य राष्ट्राने दिली आहे.' त्यात म्हटले आहे की, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ISIL चे महत्त्वपूर्ण सदस्य आहेत. ' गेल्या वर्षी मेमध्ये इस्लामिक स्टेट (ज्याला आयएसआयएस, आयएसआयएल आणि देश असेही म्हटले जाते) दहशतवादी संघटनेने भारतात नवीन 'प्रांत' स्थापन केल्याचा दावा केला होता. काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमकीनंतर ही एक वेगळीच घोषणा केली होती.
यापूर्वी या दशतवादी संघटनेने आपल्या नव्या शाखेचं नाव अरबी नाव ‘विलायह ऑफ हिंद’ असल्याचं अमाक या वृत्तसंस्थेद्वारे सांगितलं होतं. परंतु जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं हा दावा फेटाळला होता. यापूर्वी, काश्मीरमध्ये आयसीसचे हल्ले त्याच्या तथाकथित खोरासन प्रांत शाखेशी जोडले गेले होते. ज्याची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली होती आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आसपासच्या प्रदेश हे त्यांचे टार्गेट होतं.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत