जमुई - बिहारमध्ये मोठी घटना घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट उधळून लावत जमुई पोलिसांनी शनिवारी जंगलात लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली. झाझा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुडपनिया जंगलात नक्षलवाद्यांचा एक गट जमा होत असल्याची माहिती जमुई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शस्त्रे जप्त केली आहेत. जमुईचे एसपी प्रमोद कुमार मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नक्षलवादी बांधकामाधीन पूल आणि रस्त्याचे नुकसान करण्याच्या तयारीत होते.पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, २१५ सीआरपीएफचे योगेंद्र सिंह मौर्य, पोलीस उपअधीक्षक ऑपरेशन सुधांशु कुमार, उप कमांडंट सीआरपीएफ २१५ संदीप कुमार, सीआरपीएफ २१५ चे सहाय्यक कमांडर अमर राज, एसटीएफचे उपनिरीक्षक बैकुंद आणि झाझा पोलिस स्टेशनच्या नेतृत्वाखाली पुअनि वीरभद्र कुमार सिंह, सअनि दिलीप कुमार चौधरी यांच्या दलासमवेत गट तयार करण्यात आला.त्यांनी सांगितले की, जुडपनिया जंगल परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान, जुडपनिया गावातील राखा बटको जंगलात जमिनीखाली संशयास्पद परिस्थितीत लपवून ठेवलेले प्लास्टिकचे ड्रम सापडले, ते उघडले असता, 100 किलो अमोनियम नायट्रेट आणि जवळच देशी बनावटीचा मास्ककेट आणि देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला. झाझा पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा खुलासा करताना एसपींनी सांगितले की, या घटनेत नक्षलवादी पिंटू राणा याच्या टोळीचा हात आहे. त्यांच्या मते, यापूर्वी नक्षलवादी प्रकरणात तुरुंगवास भोगलेल्या विजय कुमारचे या घटनेत नवीन नाव येत आहे. विजय हा स्फोटक डिलिव्हरी करत होता.एसपीच्या म्हणण्यानुसार, सध्या पोलिस नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांविरोधात त्यांच्या स्तरावर कारवाई करत राहतील आणि सध्या या प्रकरणात जी काही नाव समोर येतील, त्यावर एफआयआर नोंदवला जाईल.
नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला, पोलिसांनी जंगलात लपवून ठेवलेली स्फोटके-शस्त्रे केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 8:32 PM