जम्मू - काश्मीर - जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जाचे कलम हालविल्यानंतर चिडलेल्या दहशतवाद्यांनी आता ट्रक ड्रायव्हर, व्यापारी आणि इतर राज्यांतील मजुरांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. त्याप्रमाणे जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी लष्कर - ए - तोयबाच्या तल्हा नावाच्या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. लष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर म्हणून तल्हा कार्यरत होता. पाकिस्तानी खुणा असलेल्या वस्तू त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच तो अनेक दहशतवादी गुन्ह्यात सामील असल्याची माहिती उघडकीस आली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर येथील बांदीपोरा भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व स्फोटकं देखील जप्त करण्यात जवानांना यश आले आहे. कारवाईत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या कारवाईनंतर परिसरात शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आलेली आहे. आणखी दहशतवादी या भागात दडून बसलेले असल्याची माहिती मिळालेली होती. बांदपोरामधील लाडूरा गावात दहशतवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या गावास वेढा देत शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. यावर जवानांनी दिलेल्या चोख प्रतित्त्युरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. रविवारी सायंकाळी देखील जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.याआधी श्रीनगर येथील मौलाना आझाद रोडवरील मार्केट परिसरात ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात पंधराजण जखमी झाले होते. तसेच, जम्मू-काश्मीरमधील सोपार भागात पोलिसांना लष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले होते. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्र व स्फोटकं देखील जप्त करण्यात आली होती. तारिक चन्ना असं या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची पोलिसांकडे आहे.
काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 6:39 PM
तो अनेक दहशतवादी गुन्ह्यात सामील असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देलष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर म्हणून तल्हा कार्यरत होता. रविवारी सायंकाळी देखील जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.