बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात मित्रांसोबत पैज लावताना जास्त मोमो खाल्ल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या मृत्यूमागे कट असल्याचा आरोप तरुणाच्या वडिलांनी केला आहे. मित्रांच्या ग्रुपची मजा आणि खेळ गुरुवारी घातक ठरला. त्यांच्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना सिवान जिल्ह्यातील बदिहरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत पैज लावल्यामुळे तरुणाने जास्त प्रमाणात मोमोज खाल्ले. यानंतर प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या मित्रांवर गुन्हेगारी कटाचा आरोप केला आहे. बिपिन कुमार पासवान असे मृताचे नाव आहे. तो मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात कामाला होता.
‘महाराष्ट्र विधानसभेत मला विरोधी पक्षनेता बनवा’, काँग्रेसच्या आमदाराचं थेट मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र
मिळालेली माहिती अशी, बिपिन कुमार पासवान नेहमीप्रमाणे गुरुवारी त्याच्या दुकानात गेला आणि नंतर त्यांच्या मित्रांना भेटला. यावेळी मित्रांच्यात कोण जास्त मोमोज खातं याची पैज लागली. जास्तीत जास्त मोमोज खाण्याची मित्रांची अट पासवान यांनी मान्य केली आणि सतत मोमोज खाण्यास सुरुवात केली. काही वेळाने पासवान अचानक बेशुद्ध पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
बेशुद्ध होण्यापूर्वी बिपिन पासवान यांनी मोठ्या प्रमाणात मोमोज खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पासवान यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस पथक पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहे. मात्र, अधिक मोमोज खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
मृत बिपिन कुमार पासवानच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मित्रांवर त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. बिपिन पासवान यांच्या मित्रांनी जाणूनबुजून मोमोज खाण्याची अट घातली आणि यादरम्यान आपल्या मुलाला विष दिले, असा आरोप त्यांनी केला. गोपालगंज जिल्ह्यातील थावे पोलीस स्टेशन प्रभारी म्हणाले की, अद्यापपर्यंत कुटुंबाच्या वतीने पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. गोपालगंज एसडीपीओ प्रांजल यांनी सांगितले की, हे प्रकरण सिवान जिल्ह्यातील बधरिया पोलीस स्टेशन परिसरातील ग्यानी मोडशी संबंधित आहे. प्रकरण बधिया यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.