शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ॲट्रॉसिटीप्रकरणी वकिलाला ६ महिने कारावास; ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 6:06 AM

वाडा येथे २०१५ मध्ये हा प्रकार घडला होता. तक्रारदार रामचंद्र जाधव आणि आरोपी भोईर हे दोघे परिचयाचे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून तक्रारदाराला जातीवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भागवत यांनी वकील प्रमोद भोईर यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरल्याची माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी गुरुवारी दिली. 

वाडा येथे २०१५ मध्ये हा प्रकार घडला होता. तक्रारदार रामचंद्र जाधव आणि आरोपी भोईर हे दोघे परिचयाचे आहेत.  भोईर यांनी जाधव यांना ११ जुलै २०१५ रोजी फोन करून एक लाखाची मदत करा, अशी विनंती केली होती. त्यांनी इतरांकडून  पैसे गोळा करून त्यांना एका महिलेमार्फत दिले. मात्र ठरल्यानुसार पैसे परत मागण्यासाठी जाधव यांनी भोईर यांना संपर्क केला असता त्यांचा फोन घेतला नाही. 

त्यानंतर पुन्हा २९ जुलैला मित्राच्या मोबाइलवरून जाधव यांनी फोन करून भोईर यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी पैशांची मागणी केल्याच्या रागातून भोईर यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल झाला होता. 

६ साक्षीदार तपासले सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी या खटल्यात सादर केलेले पुरावे आणि सहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला ॲट्रॉसिटी कायद्यान्वये दोषी सहा महिने कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने बुधवारी सुनावली.