गोंदिया: शहराच्या चना लाईन, नगरपरिषद चौक, येथील शिव ट्रेडर्स या दुकानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना २२ सप्टेंबर रोजी सुरू असताना क्रिकेट सट्टा खेळविणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. ४० हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहे.
विशाल ऊर्फ विक्की अशोककुमार वाधवानी (३३, रा. झुलेलाल वाॅर्ड, मिरची गोडावूनच्या समोर, सिंधी कॉलनी, गोंदिया) व विक्की बजाज (साई कॉलोनी, गोंदिया) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विघ्ने, पोलिस हवालदार तुलसीदास लुटे, राजेंद्र मिश्रा, बिसेन, गायधने, मेहर, केदार यांनी केली आहे. आरोपी विशाल ऊर्फ विक्की अशोककुमार वाधवानी (३३) याने १० हजार रुपयात विक्की बजाज याच्याकडून ती आयडी घेतली असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींवर महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम ४,५, सहकलम १०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.