लग्नांनंतर दोन्ही बायका गेल्या सोडून, दिराला वहिनीवर आला संशय; नंतर घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:48 PM2022-03-27T21:48:41+5:302022-03-27T22:03:55+5:30
Murder Case : संशय आल्याने त्याने वहिनीचा खून केला. आरोपीने हत्येपूर्वी काळे कपडेही खरेदी केले होते. ही घटना बड़वानी जिल्ह्यातील पाटी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
बड़वानी - मध्य प्रदेशातील बड़वानी जिल्ह्यातील जसमाबाई हत्या प्रकरणाचा पोलिसांनी २४ तासांत उकल केली. महिलेची हत्या तिच्या दीरानेच केली होती. पोलिसांनी आरोपी दिराला अटक करून तुरुंगात पाठवले. संशय आल्याने त्याने वहिनीचा खून केला. आरोपीने हत्येपूर्वी काळे कपडेही खरेदी केले होते. ही घटना बड़वानी जिल्ह्यातील पाटी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
विशेष म्हणजे एक दिवसापूर्वी पाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. अंगणात महिलेचा मृतदेह रक्ताने माखलेला आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटवली. या तपासादरम्यान जसमाबाई असे मृत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबीयांशी बोलल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दुसरीकडे, पोलिसांनी या हत्याकांडाची चर्चा कुटुंबात आणि परिसरात केली. यादरम्यान असे कळले की, जस्माबाईचा दीर भुरला तिचा खूप तिरस्कार करायचा. भुरलाने दोन लग्ने केली होती, पण दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या होत्या. वहिनीमुळे बायका निघून जातात, असे आरोपीला वाटत होते. ६ वर्षांपूर्वी भाऊ आणि वहिनीमध्ये प्रचंड वाद झाल्याचे पोलिसांना समजले. यामुळे भुरला घरातून निघून गेला होता. आता जसमाबाईचा जीव गेल्यावरच घरी परतेन, असे सांगून ते त्यावेळी गेले होते.
अंतर्वस्त्रामुळे उलगडले आत्महत्येचे गूढ, म्हणून नवविवाहित महिलेने संपवले आयुष्य
सुटकेसमधून प्रियकर प्रेयसीचा मृतदेह घेऊन जात होता, पोलिसांनी पकडले तर म्हणाला...
ही घटना आहे
आरोपी गुजरातला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. 15 दिवसांपूर्वी तो भोंगर्या साजरा करण्यासाठी गावात आला होता. घरी जाण्यापूर्वी त्याने बड़वानी च्या बाजारातून लोखंडी धारदार शस्त्र विकत घेतले. कोणी ओळखू म्हणून काळे कपडेही घेतले. त्याच रात्री तो वहिनीला मारण्यासाठी गेला होता, मात्र त्यावेळी भाऊ टिकाराम व इतर नातेवाईक असल्याने त्याला मारता आले नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर शनिवारी संधी साधून झोपलेल्या वहिनीवर शस्त्राने वार केले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. आरोपीकडून घटनास्थळी पोलिसांनी शस्त्रे आणि कपडे जप्त केले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली.